आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गायकवाड मारहाण; 98 वकिलांनी कोर्टात मांडली बाजू, तरीही 8 आरोपींना 4 दिवसांचा पीसीआर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायकवाड यांना सुभेदारी विश्रामगृह येथे मारहाण झाली. - Divya Marathi
गायकवाड यांना सुभेदारी विश्रामगृह येथे मारहाण झाली.
औरंगाबाद - राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी मंगळवारी तब्बल ९८ वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. तरीही न्यायालयाने आठही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
 
मारहाण प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक व भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई घुले, रेखा उजगरे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे (रा. औरंगाबाद) यांना  सहायक पोलिस आयुक्त, चार ते पाच पोलिस निरीक्षक यांच्यासह कडेकोट बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ९८ वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेतले आहे. त्यांनी आरोपी कार्यकर्त्यांची बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून अॅड. बी.एम राठोड यांनी बाजू मांडली. हा प्रकार कट रचून  घडला आहे, यामागचे  सूत्रधार कोण आहेत. २० ते २५ लोक घटनास्थळी होते.  इतर आरोपींना अटक  करणे बाकी आहे. अटक केलेल्यांवर यापूर्वीही काही  गुन्हे दाखल आहेत. या  पोलिसांनी सादर केलेल्या मुद्द्यांवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय. एच. मोहंमद यांनी आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
 
हा नैसर्गिक उद्रेक : कार्यकर्त्यांवर हे कलम लावणे म्हणजे त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याचा युक्तिवाद या नेत्यांनी केला. गायकवाड यांच्या विरोधात कार्यकर्त्यांचा राग उफाळून आला. हा नैसर्गिक उद्रेक होय, असे मतही नेत्यांनी मांडले. गायकवाड यांच्या वैद्यकीय चाचण्या, प्राथमिक तपासानंतरच हे कलम मागे घेण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

कलम ३०७ मागे घ्या
या प्रकरणात लावलेले कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे) मागे घेण्याची मागणी मंगळवारी शहरातील दलित संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

दादर येथील आंबेडकर भवनाचा वाद असा...
आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची वास्तू गेल्या वर्षी २५ जूनच्या पहाटे गायकवाड यांच्या सांगण्यावरून पाडली होती. दी पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने ही वास्तू पाडण्याची जबाबदारी स्वीकारली होती. गायकवाड स्वतःला ट्रस्टचे सल्लागार मानत होते. त्यांनीच  आंबेडकर भवन पाडण्याचा अहवाल दिल्याचा भारिप -बहुजन महासंघाचा आरोप आहे. आंबेडकर भवन का पाडले, असा सवाल अमित भुईगळांनी केल्यावर गायकवाड यांनी  तुम्ही विचारणारे कोण, असा प्रश्न केल्याने मारहाण केल्याचे सांगण्यात येते.

पुढील स्‍लाइडवर वाचा,
- रत्नाकर गायकवाड यांनीच कार्यकर्त्यांना उचकवले, पक्षाला बदनाम करण्याचे षड‌्यंत्र; भारिपचा दावा
- औरंगाबादेत दलित नेत्यांनी घेतली सीपींची भेट
- रत्नाकर गायकवाड यांच्‍या मारहाणीचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...