आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Minister Asokarav Chavan In Aurangabad

काँग्रेसमध्ये \"सफाई\' करण्याची गरज, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत मोदी लाट वगैरे काही नव्हती. काँग्रेसचा पराभव हा अंतर्गत हेव्यादाव्यांमुळेच झाला आहे. याची चौकशी करून पक्षांतर्गत पातळीवर साफसफाईची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या दुष्काळ आढावा मेळाव्यात ते बोलत होते.

निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात काँग्रेसच्या दुष्काळ समितीची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभवाला आपण सर्वच जबाबदार असल्याचे म्हटले. यासाठी नियुक्त समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांपर्यंत साफसफाईची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

चुकांमुळे सत्ता जाणे चुकीचे : काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केवळ कोणाच्या लाटेमुळे झाला नाही. बहुतांश ठिकाणी काँग्रेस उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मन लावून काम केले असते तर दुप्पट उमेदवार विजयी झाले असते, असेही चव्हाण म्हणाले.

आयआयएमवर चुप्पी : आयआयएम औरंगाबादलाच हवे, याचा अशोक चव्हाण यांनी पुनरुच्चार केला. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अडीच महिन्यांचा कालावधी असताना त्यांनी औरंगाबादचा निर्णय का घेतला नाही, या प्रश्नावर चव्हाण यांना केल्यानंतर त्यांनी यावर चुप्पी साधली.
आज मुंबईत बैठक
दरम्यान, काँग्रेसच्या पराभवावर मंथन करण्यासाठी मंगळवारी मुंबईत राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय घेतले जाण्याचे संकेत या वेळी देण्यात आले. नेमकी कोणावर कारवाई होणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र समोर आले नाही.