आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा क्रेडिट कार्ड न वापरण्‍याचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गुरुवारी व्यापारी महासंघाने देशाची अर्थव्यवस्था : दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान झाले. क्रेडिट कार्डमुळे देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. थकीत रकमेवर कंपन्या तब्बल ४८ टक्के व्याज आकारत आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणे ही स्वत:बरोबरच देशाचीही लूट करून घेणे असल्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणे टाळा, असा सल्ला त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. तापडिया नाट्यमंदिरात तब्बल तीन तास चव्हाणांनी अर्थव्यवस्थेबद्दल आपली मते मांडली.

व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, सीए संघटनेचे अध्यक्ष अलकेश रावका आणि कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष आलोकसिंग हे उपस्थित होते. अमेरिकेत क्रेडिट कार्ड कंपन्यांवर सरकारने टाच आणली. एका स्वॅपचे शुल्क ४५ सेंट होते. ते तेथील सरकारने २१ सेंट इतके खाली आणले. त्यामुळे तेथील क्रेडिट कार्ड कंपन्यांना मोठा तोटा आला. तेव्हा त्यांची नजर जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था भारताकडे गेली. तेथे मोठे व्याज व्यवसाय मिळेल या लालसेपोटी त्यांनी सरकारशी करार केला. मोदी सरकारनेही हा करार कसा केला हा प्रश्नच आहे. मोदींना चक्क गंडवले गेले, असा माझा आरोप आहे, असे चव्हाण म्हणाले. नोटबंदी हा अमेरिकेतील क्रेडिट कार्ड कंपन्यांशी केलेल्या दबावापोटी केलेला प्रकार आहे. नोटबंदीने काहीच साध्य झाले नाही. त्यामुळे डिजिटल व्यवहार वाढले. पेटीएम, क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांना सरकारी पातळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. हा सर्व प्रकार पाहून मला देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी वाटते, असे त्यांनी सांगितले. 
 
फायदे अनेक : समजा एखाद्या क्रेडिट कार्डवर एक लाख रुपयांची लिमिट असेल तर कार्डधारकाला ही रक्कम ५० दिवस वापरात येते. मात्र ५० व्या दिवशी ही रक्कम भरली नाही तर मात्र दंड भरावा लागतो. मिनिमम ड्यूज भरले तरी व्याज लागते. 
 
वार्षिक फी इतर शुल्क : ग्राहकांना आकर्षित करण्यासठी सुरुवातीला बँका किंवा कंपन्या वार्षिक फी माफ करतात. मात्र ही आॅफर एका वर्षात संपते. त्यानंतर कार्डचा प्रकार आणि क्रेडिट लिमिटच्या आधारे वार्षिक एक हजार रुपये ते ५००० रुपये वार्षिक फी वसूल केली जाते. 
 
उशिरा शुल्क भरणा : ग्राहकांकडूनकार्डवरील देय रक्कम भरण्यास उशीर झाल्यास प्रत्येक कंपनी हे शुल्क वसूल करते. ही एका ठरावीक रक्कम किंवा भरणा केलेल्या रकमेवरील टक्केवारीत वसूल केले जाते. 
 
क्रेडिट कार्डबाबत चव्हाणांनी मांडलेली मते त्याबाबत तज्ज्ञाचे स्पष्टीकरण असे 
मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे, परंतु जवळपास आठ वर्षे पंतप्रधान कार्यालयात काम केल्यामुळे मला अर्थव्यवस्थेचे बारकावे समजले म्हणून मी हे बोलतो आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी मते मांडली. त्यामुळे व्यापाऱ्यांत भीती निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यामुळे चव्हाणांच्या मतांवर आम्ही सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार विश्वनाथ बोदडे (नाशिक) यांच्याकडून स्पष्टीकरण घेतले. ते असे : 
चव्हाण : क्रेडिट कार्डावरील व्याजावर सरकारचे नियंत्रण नाही. जोवर पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड करून सरकार व्याजावर नियंत्रण आणत नाही तोवर ही कार्ड वापरणे म्हणजे स्वत:सह देशाची लूट करून तो पैसा अमेरिकेच्या खिशात पाठवण्याचाच प्रकार आहे. 
तज्ज्ञ: क्रेडिटकार्ड ज्या देशातील बँका किवा कंपनीचे आहे त्याच देशात हा सर्व पैसा जातो. उदा. एसबीआयचे कार्ड असेल तर तो पैसा भारतातच राहील, अमेरिकेत जाणार नाही. 
 
चव्हाण: कंपन्या ४८ टक्क्यांपर्यंत व्याज अाकारतात. हा दर सुरुवातीला टक्क्यांपासून सुरू होतो पन्नास दिवसांचे जोवर क्रेडिट आहे तोवर कमी व्याज लागते. मात्र त्यानंतर चक्रवाढ पद्धतीने व्याज लागते. बिल थकले की व्याज वाढून ते ४८ टक्क्यांपर्यंत जाते. 
तज्ज्ञ: व्याजाचादर बँकानिहाय महिन्याला ते टक्के असा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक यासाठी ३.३० टक्के व्याज आकारते. हे व्याज कार्डधारकाने ज्या दिवशी रक्कम क्रेडिट केली त्या दिवसापासून लागू होते. हा दर कमी भासत असला तरी वार्षिक टक्केवारी ४० %होतो. 
 
चव्हाण: ५०० रुपयांची एक नोट तयार करायला रुपये खर्च येतो. ती हजार वेळा चलनात फिरल्यानंतर बाद केली जाते. हेच ५०० रुपये क्रेडिट कार्डद्वारे एखाद्याला दिले तर एका व्यवहाराला बँका ७.५० रुपये ते १० रुपये शुल्क आकारतात. 
तज्ज्ञ: क्रेडिटकार्डची फीस, व्याज आणि इतर शुल्कांवर सेवा कर वसूल केला जातो. एक विशिष्ट टक्केवारीने फी वसूल केली जाते. किमान दर निश्चित ठरवलेला असतो. 
 
बातम्या आणखी आहेत...