आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former District Governor Dr. Bharat Pandya,Latest News In Divya Marathi

उपक्रम राबविण्यासाठी श्रमाची तयारी हवी : पंड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोणतेही उपक्रम राबविण्यासाठी मनाची व अधिक श्रम करण्याची तयारी आवश्यक असल्याचे रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.भरत पंड्या यांनी सांगितले. विविध समाजोपयोगी प्रकल्प, उपक्रम राबविण्यासह सदस्य नोंदणी व जनसंपर्क कसा ठेवावा? या विषयीचे प्रशिक्षण रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी हॉटेल मैत्रेयाज्मध्ये प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.
दोन दिवसीय प्रशिक्षणात संस्थेचे विविध उपक्रम राबविण्यासह नेतृत्वगुण, सादरीकरण , परिणामकारक सेवा प्रकल्प या विषयीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दतात्रय देशमुख (नाशिक), डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किशोर केडिया (अमरावती), डिस्ट्रिक्ट ट्रेनर राजे संग्रामसिंग भोसले (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरीचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, सचिव डॉ.राहूल मयूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गोंदिया व नाशिक झोनमधून 87 क्लबचे अध्यक्ष व सचिव प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
क्लबचे सदस्य गोपाळ शिराळकर, संजय वाणी, महेश मोकलकर, चंद्रशेखर सिकची, हेमंत कुलकर्णी यांनी क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. पल्लवी मयूर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.नरेंद्र जैन यांनी आभार मानले. शिरीष भिरूड व सुशील राका यांनी नियोजन केले.
आज समारोप : रविवारी सकाळी 9.00ला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दतात्रय देशमुख हे विविध जिल्ह्यातून आलेल्या रोटरी अध्यक्ष व सचिवांशी संवाद साधतील.