आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाचे नव्हे, खड्ड्यांचे शहर- माजी कर्णधार बिशनसिंग बेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आता काय मत व्यक्त करणार तुमच्या शहराबद्दल? तुमचे औरंगाबाद म्हणायला पर्यटननगरी असले तरी प्रत्यक्षात खड्ड्यांचे शहर आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते गुरुवारी सायंकाळी शहरात आले होते. त्यांच्या सेवेत जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांची मर्सिडीझ बेंझ कार होती. काल त्यांनी विमानतळ ते ताज हॉटेल व्हाया जळगाव रोड, सिडको एन-2, हॉटेल रामा असा प्रवास केला. दरम्यान त्यांना खड्ड्यांनी दणका दिलाच. शुक्रवारी सकाळी पत्रकारांनी त्यांना गाठले. शहराविषयी त्यांना विचारले असता, काय भयंकर खड्डे आहेत! तुमच्या शहराला खड्ड्यांचे शहर असेच म्हणावे लागेल, अशीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्षभरापूर्वी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी खड्ड्यांवर नाराजी व्यक्त केली होती.