आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री अनिल पटेलांचा सामाजिक उपक्रमात सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठणच्या राजकारणातील मोहरा अशी ओळख असलेले माजी मंत्री अनिल पटेल आता राजकारणातून काहीसे अलिप्त झाले असले तरी ते सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ आहेत.  माजी मंत्री पटेल हे आजही कोणताही सामाजिक हिताचा उपक्रम असल्यास त्यांचा हिरिरीने सहभाग घेतात. त्यांचा उत्साह आजही इतरांसाठी आदर्शदायी व प्रेरणादायी असाच आहे.
औरंगाबाद येथे असलेल्या गुजराती विकास मंडळाच्या कार्यालयातील कामकाजाकडे ते  आवर्जून लक्ष देऊन असतात. तसेच गरीब कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो म्हणूनच पैठण येथील ताराई महाविद्यालय, त्रिंबकदास पटेल ज्युनियर काॅलेज आणि थेरगाव येथे असलेले एस. पी. बाटलीवाल या शैक्षणिक संस्थांवर त्यांचे बारकाईने लक्ष अाहे. वेळप्रसंगी संस्था आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी दिशा देण्याचे काम करतात. वृक्ष लागवड, रक्तदान असे सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत, यासाठी माजी मंत्री अनिल पटेल हे संस्था, संघटना व कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहित करतात.  पैठणच्या नगराध्यक्षपदावर असताना  विकासाभिमुख कारभार केल्याने राजकीय पकड घट्ट झाली. याच बळावर त्यांचा राज्याचे अर्थ राज्यमंत्री असा राजकीय प्रवास राहिला. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजीने तात्त्विक राजकारण करणारे पटेल आता राजकारणातून अलिप्त होताना दिसत आहेत. पैठणचे राजकारण हे ९० च्या दशकात अनिल पटेल यांच्या भोवताली फिरत होते. त्या वेळी ते काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळचे समजले जात होते. आजही देशमुख घराण्याशी त्यांचे संबंध चांगले आहेत.  पैठणच्या राजकारणातून ते अलिप्त झाले असले तरी त्यांचा सल्ला आजही अनेक दिग्गज राजकीय नेते घेतात. मधल्या काळात पुन्हा ते राजकारणात सक्रिय होताना दिसले.
 
अनिल पटेल यांच्याविषयी
जन्म : २७ आॅक्टोंबर १९५०  
शिक्षण : बीएस्सी   
१९७४ ला नगर परिषद सदस्य  
१९८४ नगराध्यक्ष  
१९८९ विधान परिषद सदस्य  
१९९४   राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...