आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमालाला कवडीमोल भाव अन् म्हणे अच्छे दिन; डॉ. कल्याण काळेंचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव अन्् म्हणे अच्छे दिन आहेत. भाजप सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे उलटली आहेत. मात्र दोन वर्षांत शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या सरकारच्या विरुद्ध लढा उभारावा लागणार आहे. तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केले.

तालुका काँगेसच्या कमिटीच्या वतीने तालुक्यातील गणोरी, वाणेगाव, बाबरा, आळंद येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.

या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समितीचे माजी सभापती संदीप बोरसे, देवगिरी साखर कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आबाराव सोनवणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, पाथ्रीचे सरपंच वरुण पाथ्रीकर उपस्थित होते. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खरिपाच्या लागवडीसाठी कपाशी, बाजरी, मका, रासायनिक खते यांच्या प्रत्येकी दोन-दोन बॅग, भेंडीचे बियाणे, कीटकनाशक औषधी वाटप करण्यात आली. ते म्हणाले की, फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेतून जवळपास ६०० विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या.

विहिरी मंजूर करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी मंजूर केल्या आहेत. त्यातील एकाही विहिरीची मंजुरी आचारसंहितेच्या काळातील नाही. तुम्ही या विहिरीच्या मंजुरीच्या तारखा तपासून बघा जर त्यातील एकाही विहिरीची मंजुरी आचारसंहितेतील काळातील असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात ४२ जाहीर सभा घेतल्या. मात्र एकट्या मराठवाड्यात हजार ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु एकदाही त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत तर दूरच पण साधी भेट घेऊन दिलासा दिला नाही. यामुळे काँग्रेसच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे फक्त सांत्वन करता त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खरिपाच्या लागवडीसाठी रासायनिक खते बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

सरकारला अपयश
भाजपसरकार झोपेचे सोंग घेत आहे. शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यात सरकारला अपयश आले आहे. दुष्काळी अनुदानातून कापसाला वगळल्याने शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून उद्योगपतींचे असल्याचा टोलाही माजी आमदार डॉ. कल्याण काळेे यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...