आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President, Dr. Bharat Ratna. APJ Abdul Kalam Today N Auranbagad

मिसाइलमॅन, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आज औंरगाबादेत व्‍याख्‍यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मिसाइलमॅन, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम २९ जानेवारीला शहरात येत आहेत. त्यांचे एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी पावणेपाच वाजता "इनोव्हेशन्स इन इंडिया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यशवंत प्रेरणादायी व्याख्यानमालेत ते दुसरे पुष्प गुंफणार आहेत. सीएमआयए, आस्था, एमजीएमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कलाम यांच्या दौऱ्याचा तपशील असा
: २९ रोजी सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथून विशेष विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी साडेबारा वाजता औरंगाबादेत आगमन. कारने वाळूज येथील स्टरलाइट टेक्नॉलाजी सेंटरकडे प्रयाण, दुपारी तीन ते साडेचार स्टरलाइट विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी पाच वाजता रुक्मिणी सभागृह येथे आगमन. सायंकाळी साडेसहा वाजता विमानतळावर आगमन आणि सात वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
कलाम यांच्या सुरक्षेसाठी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, सहा पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे दीडशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.