आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President Dr. APJ Abdul Kalam In Aurangabad City

एकमेवाद्वितीय व्हा..! डॉ.कलाम यांनी विद्यार्थ्यांनमध्‍ये भरला आत्मविश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विद्यार्थ्यांनो, उंच उडण्याचे स्वप्न पाहा, पण उंच उडण्यासाठी आधी शिक्षण घेऊन ज्ञानी व्हा अन् मग ज्ञान मिळवून एकमेवाद्वितीय व्हा, असा सल्ला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी औरंगाबादेत दिला. सीएमआयए, एमजीएम आणि अास्था फाउंडेशनतर्फे गुरुवारी (२९ जानेवारी) रुक्मिणी सभागृहात आयोजित तिसऱ्या यशवंत व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास भरला. डॉ. कलाम यांचे विचार त्यांच्याच शब्दांत.

‘शिक्षण घेतल्याने आपल्याला डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, शिक्षक अथवा राजकीय नेता होता येते. मात्र, आपल्या आयुष्यात केवळ एवढेच ध्येय असता कामा नये. ठरवलेली उद्दिष्टे गाठल्यानंतर त्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय होता आले पाहिजे. टेलिफोनचा शोध लावणारे अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल, दोन वेळा नोबेल पुरस्कार िमळवणाऱ्या आणि रेडियमच्या शोध लावणाऱ्या मेरी क्युरी यांनी कठाेर परिश्रम घेतले. महान उद्दिष्ट ठेवून त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवली तर यश हमखास मिळते. यशाच्या मार्गात अडथळे येतील, समस्यांना तोंड द्यावे लागेल; मात्र परिश्रमातील सातत्य अन् संघर्षाची तयारी सर्व अडथळे दूर करेल अन् एकमेवाद्वितीय होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.'

पुढील स्‍लाईडवर वाचा तंत्रज्ञानाविषयी कलाम यांचे विचार...