औरंगाबाद- केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर देशात जातीय दंगली वाढल्या आहेत, अशी टीका राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केली.
पाटील यांच्या हस्ते औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद दाभाडे यांचा सातारा येथील कार्यालयाचे उद् घाटन झाले. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जुबेर मोतीवाला यांच्या मोतीवाला कॉम्प्लेक्स येथील प्रचार कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, मिलिंद दाभाडे, जुबेर मोतीवाला, मनमोहनसिंग ओबेरॉय, औरंगाबाद पूर्व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद आदींची प्रमुख उपस्थिती होती. दाभाडे यांच्या प्रचार कार्यालयात पाटील केवळ दोन मिनिटे थांबले.
अहवाल प्राप्त झाला
महाराष्ट्राने नेहमीच पुरोगामी विचारांना साथ दिली असल्याचे सांगून गुजरातमध्ये भाजपने दंगे घडवून आणले, असा आरोप पाटील यांनी केला. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जुबेर मोतीवाला निवडून येतील, असा रिपोर्ट
आपणास प्राप्त झाल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले.