आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आत्महत्या; तीन कुटुंबीयांना मदतीचा हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांवरून आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील तीन शेतक-यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा समितीच्या बैठकीत प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली. फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केलेल्या जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील विलास राऊत या शेतक-या चा त्यात समावेश आहे. विलास राऊत यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी दै. ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

गतवर्षी झालेल्या अपु-या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी यंदा जिल्ह्यातील शेतक-यांचा खरीप व रब्बी हंगाम निघून गेला आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतक-या ंचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. पावसाअभावी जनावरे बाजारात विकण्याची वेळ शेतक-या ंवर आली आहे. महागडे बियाणे व खते घेऊनही उत्पादन घटल्याने आर्थिक नुकसानीमुळे शेतक-या ंना अनेक अडचणीला समोरे जावे लागत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा समितीच्या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी गुलाबराव मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जाफराबादच्या तहसीलदार सुमन मोरे, कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

घोडेगाव, हस्ते पिंपळगावच्याही शेतक-यांचा समावेश- जालना तालुक्यातील घोडेगाव येथील धर्मा सदाशिव गाडेकर या शेतक-या ने 25 सप्टेंबर 2012, हस्ते पिंपळगाव येथील राजेभाऊ नारायण मगर यांनी 24 ऑगस्ट 2012, तर जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील विलास राऊत या तरुण शेतक-याने 27 फेब्रुवारी 2012 ला आत्महत्या केली. या तिन्ही शेतक-यांचे मदतीचे प्रस्ताव जिल्हा समितीकडे आले होते. या तिन्ही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

15 दिवसांत मदत - आत्महत्या केलेल्या या तीन शेतक-यांच्या कुटुंबीयांना येत्या 15 दिवसांत प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात येणार आहे. शासनाच्या या मदतीमुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे.