आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौिजया खान यांनी मुलाखत टाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रवादीकडून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून विद्यमान राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उमेदवारीची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रीतसर मुलाखत दिल्यामुळे त्या मतदारसंघातून उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मंगळवारी मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत घेण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक उत्सुकता मध्य मतदारसंघासाठी कोण कोण मुलाखती देतात याचीच होती. त्या पार्श्वभूमीवर विनोद पाटील, कदीर मौलाना हीच मंडळी अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असतानाही पैठणमध्ये इच्छुक समोर आले, पण मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधून राष्ट्रवादीकडून कोणीही दावेदार समोर आला नाही, असे मुंबईत गेलेल्या पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या ९ मतदारसंघांतील इच्छुकांना एकाच वेळी बोलावण्यात आले होते. त्यामुळे पक्षातील प्रतिस्पर्ध्याबद्दल वाईट बोलण्याची संधी कोणाला मिळाली नाही.
पैठणमध्ये वाघचौरेंना आव्हान : पैठणमधून अप्पासाहेब निर्मळ, अनिल जाधव, बद्रीनारायण भुमरे यांनी उमेदवारी मागताना वाघचौरे यांच्या विरोधात नाराजी असल्याचा दावा केला. दरम्यान, काँग्रेसने आपले उमेदवार निश्चित केले असून महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच काँग्रेस त्यांची नावे जाहीर करतील. सूत्रांच्या मते नाराजांनी महायुतीकडे जाऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात अशोक चव्हाण यांच्या शब्दाला किंमत राहील.
फौजियांचा अर्जच नाही
फौजिया खान यांनी उमेदवारीसाठी आवश्यक असलेला अर्जच केला नव्हता. मात्र, अर्ज न केलेले कार्यकर्तेही मुलाखत देऊ शकत होते. त्यामुळे फौजिया मुलाखतीला येतात की नाही याकडे अन्य इच्छुकांचे लक्ष लागले होते.

असे आहेत प्रबळ दावेदार
मध्य : शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, गतवेळचे पराभूत उमेदवार कदीर मौलाना, जुबेर मोतीवाला, कमाल फारुकी,
पश्चिम : विनोद बनकर, विजय वाहूळ
वैजापूर : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
गंगापूर : राजू वरकड, विजय चव्हाण, डॉ. नीळ, कुंडलिक माने.
कन्नड : उदयसिंग राजपूत, मारुती राठोड, चेतन काजे
फुलंब्री : अनुराधा चव्हाण, बंटी देशमुख, पांडुरंग तांगडे
पूर्व : अभिजित देशमुख
सिल्लोड : दावा नाही.