आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Found Thirty Five Workers Absent In Municipality

तपासणीत आढळून आले पस्तीस कर्मचारी गैरहजर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- पालिकेतकर्मचारी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे प्रकार नेहमीच घडतात, त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबतात. सोमवारी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनाही याचा अनुभव आला. त्यांच्या तपासणीत तब्बल ३५ कर्मचारी गैरहजर आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.

आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सोमवारी सकाळीच नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी पालिकेत तपासणी केली. या वेळी त्यांना विविध विभागात कर्मचारीच नसल्याने शुकशुकाट दिसून आला. त्यानंतर त्यांनी १०.३० वाजता हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन कर्मचाऱ्यांची हजेरी तपासणी केली. या वेळी ३५ कर्मचारी गैरहजर आढळून आले. नगराध्यक्षांनी या प्रकाराची मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना माहिती दिली. पुजारी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाईल असे सांगितले. नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी यापूर्वी स्वच्छतेच्या कामांची सातत्याने तपासणी करून गैरहजर राहणा ऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याची कारवाई केली होती. पहाटे सहा वाजताच स्वच्छतेच्या कामांची पाहणी करण्याचा सपाटाच लावल्याने स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना शिस्त लागली होती. आता त्यांनी पालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्याने सर्वच विभागात कर्मचारी हजर राहतील नागरिकांचे कामे होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

जालना नगर पािलकेच्या मुख्यालयात एकूण १४५ कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी पस्तीस जण तपासणी दरम्यान गैरहजर आढळून आले.

उद्यान विभागाचे चौघे गैरहजर
नगराध्यक्षांनीपालिकेेेत तपासणी केल्यानंतर उद्यान विभागातही तपासणी केली यात चार कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यांच्यावरही वेतन कपातीची कारवाई केली जाणार आहे. कर्मचारी गैरहजर राहण्याचे हे प्रमाण पाहून नगराध्यक्षांनी संताप व्यक्त केला. त्यामुळेच पुढील काळात आणखी कसून चौकशी केली जाणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
काही अधिकाऱ्यांचाही समावेश
सोमवारच्यातपासणीत गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी धर्मा खिल्लारे यांच्यासह विभागप्रमुख,अभियंता,कनिष्ठ अभियंता आदींचा समावेश आहे. या पाहणीत कर विभागप्रमुख एच.ए.आंधळे, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आर.यू.बगळे, ए.आर.दासवाड, रोखपाल राजू करलीये,कनिष्ठ अभियंता राजू वाघमारे,उपअभियंता साळवे, कनिष्ठ अभियंता सऊद, रेकॉर्ड विभागाचे शमशोद्दीन आदींचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांनी धावपळ गाठली पालिका
नगराध्यक्षापार्वताबाई रत्नपारखे सकाळी ९.४५ वाजताच कार्यालयात पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागात तपासणी सुरू केली. या वेळी फारच थोडे कर्मचारी हजर होते. मात्र नगराध्यक्षा पालिकेत आल्याची माहिती मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी धावतपळत पालिका गाठली. त्यातही १०.३० वाजेनंतर तब्बल ३५ कर्मचारी गैरहजर आढळून आले.
यापुढेहीअचानक तपासणी करणार
कर्मचारीगैरहजर राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही तपासणी केली. पुढील काळातही अशाच प्रकारे अचानक तपासणी केली जाणार आहे. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सर्वांनी वेळेत कामावर हजर व्हावे अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.'' पार्वताबाईरत्नपारखे,नगराध्यक्षा,जालना.