आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी टोळीतील चौघे अटकेत; कार जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दरोड्याच्या तयारीतील इराणी टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री १०.४५ च्या सुमारास अटक केली पैठण रोडवरील बेस्ट प्राइस मॉलसमोर रस्त्याच्या कडेला अंधारात कारमध्ये थांबलेले तिघे जण तसेच विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसलेले दोघे, अशा चार जणांना या पथकाने पकडले. मात्र, एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

फतैह शैनू सय्यद इराणी (५२, रा. श्रीरामपूर), बरकत अली अन्वर सय्यद (२५ , रा. औरंगाबाद), संतोष महादू पवार (२७, रा. निपाणी), संदीप जगन्नाथ खंडीझोड (२४, औरंगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचे नाव गुराणी असे आहे. या टोळीकडून काळा कपडा, तलवार, मिरची पूड हस्तगत करण्यात आली. फतैह शैनू इराणी याच्याविरुद्ध यापूर्वी सिडको, जवाहरनगर, सिटी चौक, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी पोलिस असल्याची बतावणी करून चेन स्नॅचिंग, अंगावरील सोने तसेच पैसे काढून घेऊन फसवणूक करत होते. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ, सहायक फौजदार शेख आरेफ, पगारे, राठोड, शेख जावेद, सूर्यवंशी, लाड, नवाब शेख, शेख जमील, बिल्टे यांनी केली.