आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटनांद्रावाडीतील एकाच खोलीत चार वर्गांतील विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव बाजार- शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत आहेत. परंतु एकीकडे मात्र शैक्षणिक सोयी सुविधांचा अभाव अाणि त्यातही दाटीवाटीने एकाच वर्गखोलीत शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रावाडी येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांवर आली आहे.
  
कोटनांद्रावाडी या ग्रामीण भागातील १०० टक्के मुस्लिम समाजाच्या वस्तीतील मराठी जिल्हा परिषद  शाळा  अनेक खडतर प्रवास करीत नावारूपाला आली आहे. परंतु, या गावत अधिक सोयीसुविधा नसतानादेखील कोटनांद्रावाडी जिल्हा परिषद शाळेने १०० टक्क
 गुणवत्तेचा दर्जा मिळवला आहे. परंतु इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत असलेल्या या मराठी शाळेतील विद्यार्थी एकाच वर्ग खोलीत शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेला क्रीडांगणही आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही त्यामुळे येथील विद्यार्थी मात्र क्रीडा खेळांपासून वंचित आहेत.

मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांची येथे संख्या जास्त असून ते हिंदी भाषिक असल्याने येथील शिक्षकांना हिंदी भाषेतून  मराठी अनुवाद करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे लागतात. असे असतानादेखील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आहे. २० बाय ३० ची  एक वर्ग खोली, एक किचन शेड, एक पाण्याची टाकी एवढेच या शाळेचे भौतिक वैभव अाहे. परंतु ही शाळा खूप पुढारलेली दिसते. एकाच वर्ग खोलीत ज्ञानाची रचना कशा पद्धतीने होऊ शकते हे पाहण्यासारखेदेखील  आहे. जिल्हा परिषदेने तातडीने येथे लक्ष घालून वर्ग खोल्यांची संख्या वाढवून शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोटनांद्रावाडीसह परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे.

समस्यांच्या विळख्यात शाळा  
कोटनांद्रावाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला क्रीडांगण नाही, पुरेशा वर्गखोल्या नाहीत, विद्यार्थ्यांना मराठी भाषा फारशी बोलता येत नाही.  एकाच  वर्ग खोलीत चार वर्गांतील विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण द्यावे लागते, अशा अनेक समस्यांचा  सामना करीत आमच्या कोटनांद्रावाडी येथील शाळेने खऱ्या अर्थाने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे.
- सुजित फाळके, शिक्षक, कोटनांद्रावाडी.
बातम्या आणखी आहेत...