आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Days For Books Books Festival Starts From 28 January

'चार दिवस पुस्तकांचे' ग्रंथ महोत्सव २८ पासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरस्वतीभुवन शिक्षण संस्था आणि मराठी प्रकाशक परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३१ जानेवारीदरम्यान 'चार दिवस पुस्तकांचे' या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

२८ जानेवारी रोजी ५ सायं. वाजता ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती असेल. २९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत नवलेखक कार्यशाळा होईल. याचे उद््घाटन प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते होईल. डॉ. छाया महाजन, गणेशराज सोनाळे, डॉ. दिलीप महालिंगे मार्गदर्शन करतील. समारोप डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते होईल. याच दिवशी दुपारी1 ते 4 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी कवितेवर आधारित काव्य-चित्रस्पर्धा घेण्यात येतील. सायंकाळी 6 ते 9 या वेळेत उर्दू-हिंदी कविसंमेलन होईल. त्यात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मंगलेश डबराल, देविप्रसाद मिश्र, रंजित वर्मा, सलीम मोईनोद्दीन, दासू देशपांडे यांचा सहभाग असेल. शनिवारी (३० जानेवारी) 1 दुपारी 4 ते या वेळेत "शिक्षक-पालकांनी काय वाचावे?' या विषयावर हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 7 ते 9 या वेळेत मंगेश पाडगावकर यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कविता गीतांवर आधारित "आनंदयात्री' हा कार्यक्रम होणार आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी1 ते 4 या वेळेत आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा होईल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ग्रंथप्रकाशन आणि महोत्सवाचा समारोप रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. सुधीर रसाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच रात्री 7 ते 9 या वेळेत शालेय लोकनृत्य स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे, असेही उमरीकर यांनी सांगितले.

रसिकांसाठी पर्वणी
स.भु. शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा महोत्सव होणार असून साहित्यप्रेमी आणि वाचकांना पुस्तकांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळणार आहे. यात या महोत्सवात पुस्तकांचे ५० स्टॉलही असतील , असेही उमरीकर यांनी सांगितले.