औरंगाबाद- घराजवळीलकिराणा दुकानावर सामान घेण्यासाठी निघालेल्या सहा वर्षांच्या बालकावर चार कुत्र्यांनी हल्ला केला. नागरिक धावल्याने मुलाची सुटका झाली, मात्र तोपर्यंत एका कुत्र्याने चावा घेतला होता. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संजयनगरात (वाॅर्ड क्रमांक ५७) येथील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली.
शोएब खान अकबर खान असे त्या बालकाचे नाव असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. या भागात पाच दिवसांपूर्वी कुत्र्यांनी बकऱ्याचाच फडशा पाडला होता. त्यानंतर आज त्यांनी बालकालाच लक्ष्य केले. येथे कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार महानगरपालिकेकडे पूर्वीही करण्यात आली होती. कुत्रे पकडणारे पथकही येऊन गेले. मात्र त्यानंतरही चित्र बदलले नाही. आजच्या घटनेची माहिती दिल्यानंतर श्वान पकडणारे पथक पुन्हा एकदा आले होते. त्यांनी काही कुत्रे पकडून नेले, तरीही सायंकाळी तेथे कुत्र्यांची टोळी हजरच असल्याचे रहिवाशांनी सांगितले. लहान मुले रस्त्यावर एकट्याने फिरणाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे या वाॅर्डाचे माजी नगरसेवक डॉ. जफर खान यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी |औरंगाबाद: मागीलसहा महिन्यांपासून पकडलेल्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी थांबली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात अाली असून रोज ४० कुत्र्यांच्या नसबंदीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. आरोग्य सभापती विजय औताडे म्हणाले की, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागण्यात आलेले अतिरिक्त मनुष्यबळ वाहने दहा दिवसांत देण्याचे आश्वासन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहे. कुत्रे पकडणे त्यांची नसबंदी ही कामे मागील सहा महिन्यांपासून बंदच होती. शस्त्रक्रियेचे कंत्राट संपल्यावर नवीन ठेकेदार मिळत नव्हता. आता डाॅ. चेडे यांनी ते काम स्वीकारले आहे. याशिवाय महाराणा सिक्युरिटीज या एजन्सीची कुत्रे पकडण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. कुत्रे पकडणे दोन दिवस सांभाळ करून नसबंदी करणे या कामावर प्रति कुत्रा ६२५ रुपये खर्च मनपा करणार आहे. पशुसंवर्धन विभागाने आस्थापना यांत्रिकी विभागाकडे कुत्र्यांना पकडण्याबाबत आराखडा दिला असून त्यासाठी लागणारी साधनसामग्री मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी ३० कर्मचारी सात वाहने लागणार आहेत. प्रत्येक झोन कार्यालयाला एक अशी सहा वाहने प्रत्येक वाहनावर पाच कर्मचारी दिले जाणार आहेत.
घाटीत दोन हजार इंजेक्शन
भटक्या कुत्र्यांसाठी आता रात्री मोहीम
शहरात कुत्रे चावण्याच्या घटना वाढल्या असताना घाटी रुग्णालयामध्ये दोन हजार इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती तेथील एका डॉक्टरांनी दिली. याशिवाय स्नेक बाइटचे २०० इंजेक्शनही उपलब्ध असल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांच्या विषयावरून जोरदार टीका झाल्यानंतर आता या कुत्र्यांचा हैदोस रोखण्यासाठी खास मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एका डाॅग व्हॅनची गरज भासणार आहे. शिवाय रात्रीच्या वेळी कुत्र्यांना पकडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.