आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील चार शेतक-यांच्या आत्महत्या, सरकारच्या अनास्‍थेचे बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात तीव्र होत चाललेले दुष्काळाचे संकट आणि राज्य सरकारची अनास्था यामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सोमवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि उस्मानाबादेतील आणखी चार शेतक-यांनी आत्महत्या केल्या.
नांदेडच्या बिलोली तालुक्यात मसना एतोंडे (२७), अर्धापूर तालुक्यात शिवाजी कदम (३०) यांनी शेतात , औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथे सुनील काळे (४२) , उस्मानाबाद जिल्ह्यातील माडज येथील नरसिंग लिंबाजी शहापुरे (७०) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
काळे यांनी नापिकी व बँकेचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च व मुलीच्या लग्नाची चिंता या कारणाने घरातील ओसरीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काळे यांना एकूण ७ एकर जमीन होती. सोयाबीन व कापसाने दगा दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. एतोंडे यांना दोन एकर शेती आहे. नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. कदम यांच्याकडे कर्ज होते. काळे यांना सात एकर शेती होती. पीककर्ज व नापिकी यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपवली. शहापुरेंच्या पत्नीच्या नावावर माडज शिवारात ६० आर जमीन आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शहापुरे यांच्यावर कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.