आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Four Major Parties Find New Candidate In Aurangabad District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीचे तीनतेरा वाजताच औरंगाबाद जिल्ह्यात प्रमुख पक्षांकडून उमेदवारांचा शोध सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीचे तीनतेरा वाजताच जिल्ह्यात चारही प्रमुख पक्षांकडून मित्रपक्षांच्या मतदारसंघात उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात धक्कादायक उमेदवार समोर येण्याचीही शक्यता राजकीय हालचालींवरून वाटू लागली आहे.
औरंगाबाद मध्यमधून तिकीट मागणारे माजी आमदार किशनचंद तनवाणी , जैस्वाल हे अर्ज भरण्याची सूचना मिळाल्यापासून नॉट रिचेबल झाले आहेत.
सूत्रांनुसार शिवसेनेच्या तिकिटासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे भाजपला मध्य मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याने त्यांनी तनवाणी यांच्यावर जाळे टाकले आहे. . दुसरीकडे वेळ आली तर संजय केणेकर अथवा डॉ. भागवत कराड यांना मैदानात उतरवण्याचा बी प्लॅन भाजपने तयार ठेवला आहे.

> राष्ट्रवादीला औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, औरंगाबाद प. मतदारसंघात उमेदवाराची चणचण भासणार आहे. पश्चिमसाठी उमेदवार देण्याची जबाबदारी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर सोपवल्याचे वृत्त आहे.
> सिल्लोडमध्ये राष्ट्रवादीचे प्रभाकर पालोदकरांची अब्दुल सत्तारांशी जवळीक निर्माण झाली. तालुका प्रमुख श्रीरंग साळवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठगण भागवत न्यायालयीन लढाईतच व्यस्त आहेत.
> रंगनाथ काळे मागील काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून लांब असल्याने उमेदवार शोधणे राष्ट्रवादीला दुरापास्त होईल. काँग्रेसला जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात उमेदवार शोधण्याची गरज पडणार नाही.