आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Four People Arrested For Trapping Girl In Sex Business

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गतिमंद मुलीला देह व्यापार करण्‍यास भाग पाडणा-या चौघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अठरावर्षीय गतिमंद मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या रॅकेटचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एमजीएमसमोरील (एन-6) हॉटेल विजय रेसिडेन्सी येथील हा प्रकार असून सोमवारी (10 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजता दोन ग्राहक, दोन दलालांना अटक करण्यात आली. आंटी व तिचा साथीदार फरार झाला आहे.


नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांना कळाले. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांच्यासह विजय रेसिडेन्सी हॉटेल गाठले. हॉटेलच्या खोली क्रमांक 201 मध्ये या मुलीसोबत दोन जण अश्लील चाळे करत होते. त्यांना ताब्यात घेतले. दलाल संदीप राजू साळवे व आकाश साळवे या सख्ख्या भावांना अटक केली.


दोन्ही ग्राहक पैठण, आपेगावचे आहेत. संतोष अशोक शिंदे (35) व शेख यासीन शेख सलीम (25) अशी त्यांची नावे आहेत. चार हजार रुपयांत मुलीचा सौदा केला होता. साळवे कुटुंबच यामध्ये अडकले आहे. संदीप व आकाशची आई शोभा साळवे साथीदार जावेदसह फरार झाली आहे. ही कारवाइ सहायक फौजदार प्रकाश जेकब, भीमराव पवार, संपत लाला राठोड, सुखदेव जाधव, मिलिंद भंडारे, दीपक शिंदे, समाधान इंगळे सहभागी होते.


दवाखान्याचा बहाणा करून हॉटेलात आणले
हॉटेल विजय रेसिडेन्सी या प्रकरणात अजिबात सहभागी नसून येथील मॅनेजरची दिशाभूल करून येथे ग्राहक आणण्यात आले. मुलगी गतिमंद असल्याचे सांगून तिला रुग्णालयात उपचारासाठी आणल्याचा ग्राहक आणि दलालांनी बनाव रचला. शिवाय तिच्यासोबत काही नातेवाईकही थांबणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे व्यवस्थापकाने त्यांना खोली उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.