आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Police With Seven Other Arrested In Aurangabad

औरंगाबादेत चार जुगारी पोलिसांसह सात जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिलकॉर्नर येथील जोहर हॉटेलवर बुधवारी टाकलेल्या छाप्यात चार पोलिसांसह सात जणांना गुन्हे शाखेने पकडले. मात्र, गुन्हे शाखेचेच दोन कर्मचारी निसटले. या छाप्यात पोलिसांनी सव्वा तीन हजार रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


हॉटेल जोहरमध्ये जुगार चालतो, अशी माहिती मिळताच पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सायंकाळी छापा मारण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक अर्जून पवार, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या पथकातील 11 जणांनी हॉटेलमधील रूम क्र. 201 मध्ये छापा मारला. या वेळी पोलिस कर्मचारी कडुबा पुंगळे (रा. सारासिद्धी अपार्टमेंट, हर्सूल), गुणवंत जोगदंड (रा. एन-9, सिडको), सुरेश घाटेकर (रा. क्रांती चौक पोलिस कॉलनी), भाऊसाहेब बोर्डे (रा. पोलिस मुख्यालय), सचिन पाटील (रा. भोईवाडा), महेंद्र तायडे ( रा. कलाशांती अपार्टमेंट, उस्मानपुरा) व जिल्हा रुग्णालयातील वाहनचालक विठ्ठल रखमाजी करपे (रा. मिटमिटा) यांना पकडण्यात आले. छापा पडताच गुन्हे शाखेचे कैसर फतरू पटेल व लालखान जाफरखान पठाण पसार झाले. या हॉटेलचे मालक मोहंमद आदील मोहंमद जमील यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. छाप्यात पोलिसच जुगार खेळताना सापडल्याने खळबळ उडाली आहे.