आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तालुक्यांसाठी स्वतंत्र जनता बस फेऱ्यांचे नियोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- सर्वसामान्य नागरिकांना सुखकर प्रवासासाठी एकमेव आधारभूत असलेल्या राज्य परिवहन एस.टी.महामंडळाच्या वैजापूर एस.टी.आगाराने चार तालुक्यांसाठी दिवसभर “स्वतंत्र जनता बसच्या फेऱ्या’ सुरू करण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे.  
 
कोपरगाव, येवला, श्रीरामपूर, गंगापूर या चार तालुक्यांत ये - जा करणाऱ्या प्रवाशांसाठी वैजापूर एस.टी.आगाराने येथून दिवसभर बारा बसच्या माध्यमातून बससेवा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे. वैजापूरहून अवघ्या तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चारही तालुक्यांना यापूर्वी प्रवाशांना स्वतंत्र बससेवा येथून कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या  गैरसोयीचा सामना करावा लागत होता. 
 
विशेषत: अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रवाशांना प्रवासासाठी अवलंबून राहावे लागत होते. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेत वैजापूर एस.टी.आगार व्यवस्थापनाने चार तालुक्याला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर बारा बस सुरू करून रस्त्यावर बोकाळलेली अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मक्तेदारी मोडीत काढण्याची भूमिका घेतली आहे. रस्त्यावर वरील सर्व बसथांब्यावर बसची सुविधा आहे.  
 
असे आहे जनता बससेवेचे नियोजन : वैजापूर एस.टी.बसस्थानकातून सकाळी साडेसात वाजेपासून येवला, गंगापूर ,कोपरगाव,श्रीरामपूरसाठी प्रत्येकी तीन बसेस दिवसभरात प्रवासी वाहातुकीच्या चार फेऱ्या करतील.  त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
 
प्रवासी वाढवा उद्दिष्टपूर्तीवर भर
वैजापूर एस.टी.आगाराला परिवहन विभागाने प्रवासी वाढवा उपक्रमात प्रतिदिन १६ हजार ९८९ चे उद्दिष्ट दिले आहे. आगाराच्या बससेवेतून जवळपास दररोज सोळा हजार प्रवासी वाहतूक करण्याचा टप्पा गाठल्याचे आगार व्यवस्थापक आर.बी.राजपूत यांनी सांगितले. सुरक्षित प्रवासासाठी एस.टी.ने प्रवास करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
बातम्या आणखी आहेत...