आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fourth Culprit Got Police Custody In Tisgaon Rape Case

तिसगाव बलात्कार प्रकरणातील चौथ्या आरोपीच्याही मुस्क्या आवळल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिसगाव बलात्कार प्रकरणातील चौथ्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली. बबन सोनवणे असे त्याचे नाव असून चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साजापूर येथील सतरावर्षीय तरुणी सोमवारी (दि.२१) रात्री मित्रासोबत फिरण्यासाठी गोलवाडी फाट्याकडे गेली असता रूपचंद तीर्थे, शेख सत्तार, मच्छिंद्र गायकवाड बबन सोनवणे (सर्व रा. तिसगाव) या चौघांनी तरुणाला मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. मंगळवारी रात्री शहर गुन्हे शाखा, छावणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्तरीत्या कामगिरी बजावून या चौघांना अटक केली. आरोपींविरोधात ठोस पुरावे सापडले असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी यापूर्वी अशा घटनांमध्ये सहभागी असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलिस त्या दिशेनेदेखील तपास सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. आरोपींना अटक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

एकलाखाचे बक्षीस : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक करणाऱ्या गुन्हे शाखा, छावणी एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या पथकाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. या पथकात एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, पोलिस हवालदार गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, बाबासाहेब आंधळे, योगेश कुलकर्णी, छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे, पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पठाण, कोल्हे, तर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश अघाव, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, वाघ आदींचा समावेश आहे.