आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे कमावण्यासाठी त्याने ठरवले नातलगालाच अनाथ, पैसे उकळण्यासाठी बनाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच श्यामला ब्रेन ट्युमर झाल्याचा बनाव शेळकेने केला होता. - Divya Marathi
याच श्यामला ब्रेन ट्युमर झाल्याचा बनाव शेळकेने केला होता.
जालना, औरंगाबाद - श्याम नांदरे नामक आपल्याच नातलग तरुणाला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगून त्याच्या मदतीसाठी निधी देण्याचे आवाहन करणाऱ्या आणि ‘दिव्य मराठी’सह सामाजिक कार्यकर्त्यांनाही फसवणाऱ्या जालना येथील अमर शेळकेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित तरुणाला असा आजारच नसल्याचे समोर आले असून तो अनाथ असल्याचा दावाही खोटा ठरला आहे. त्याच्याच वडिलांनी अमर शेळकेवर फसवणूक आणि धमकी दिल्याची फिर्याद नोंदवली आहे.

‘अनाथाच्या उपचारासाठी तरुणाईने जमवले ३ लाख रुपये!’ अशा आशयाचे वृत्त ४ जून रोजी ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाले होते. त्यात श्याम नांदरे नामक अनाथ तरुणासाठी अमर शेळके यांच्या पुढाकाराने जालन्याचे तरुण मदत गोळा करीत असून ३ लाख रुपये जमा करण्यात आले, असे नमूद करण्यात आले होते. ही माहिती अमर शेळके यानेच ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला लेखी स्वरूपात दिली होती.

शेळके यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांनीही २५ हजार रुपये अमर शेळके याच्याकडे दिले, असे त्यांनीही लेखी स्वरूपात कळवले होते. त्यामुळे त्या मदतीचा उल्लेखही बातमीत करण्यात आला होता. मात्र, हे सारे खोटे असल्याचे आणि अमर शेळकेविरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचे श्याम नांदरे यानेच ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊन स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अमर शेळके याच्याशी वारंवार संपर्क करूनही त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. अजय किंगरे यांनीही ही बाब स्पष्ट झाल्यावर आपली अमर शेळकेने फसवणूक केल्याचे लेखी मान्य केले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण अनेकांना मदतीचे आवाहन केले आणि लोकांनीही मदत केली. त्या सर्वांना आपण आपल्याकडून सर्व पैसे परत करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेन ट्यूमर नाहीच
श्याम आणि त्याचे वडील संपत नांदरे यांनी सांगितले की, श्यामला ब्रेन ट्यूमर झालेलाच नाही. त्यासंदर्भातले वैद्यकीय अहवाल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. वेगळ्या उपचारांसाठी श्याम रुग्णालयात दाखल असताना अमर शेळके याने त्याचे छायाचित्र घेतले आणि त्याचा गैरवापर केला. जमवलेल्या निधीतील एक रुपयाही त्याने कधी श्यामसाठी खर्च केलेला नाही. त्यासंदर्भात त्याला जाब विचारला असता त्याने घरी येऊन धमकावले आणि त्यासंदर्भात आपण एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादही नोंदवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमर शेळके हा नांदरे यांचा नातलग असला तरी आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...