आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भामट्या निर्मात्यास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘माहेरच्या आठवणी’ या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका देण्याचे आमिष दाखवून राज्यातील शेकडो मुलांना लाखो रुपयांनी फसवणार्‍या दीपक मस्के (मुकुंदवाडी) या भामट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सहा महिन्यांपूर्वी दैनिकात जाहिराती देऊन बेरोजगारांना बोलावून त्याने फसवणूक केली आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बुधवारी (26 जून) रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुरुवारी (27 जून) पोलिसांनी त्याला अटक केली.

म्हस्के ‘नटरंग’ फिल्म प्रॉडक्शनचा निर्माता असून चित्रपटासाठी सहकलाकाराची गरज असल्याच्या जाहिराती त्याने केल्या. प्रलोभनाला बळी पडत राज्यभरातील अनेक तरुण-तरुणींनी म्हस्के याच्याशी संपर्क साधला. म्हस्केने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. मात्र, म्हस्के फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही तरुण-तरुणींनी त्याच्याकडे पैसे परत मागितले. त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तरुणांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेऊन सर्व हकिगत सांगितली. त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

कसे फसले तरुण ?
म्हस्केला कोणताही तरुण भेटला की तो कलाकारांसोबतचे फोटो दाखवतो. हे पाहून तरुणही फसले. म्हस्के जेवढय़ा पैशांची मागणी करत तेवढे पैसे गरजू तरुण त्याला द्यायचे.

पैसे परत मिळाले पाहिजेत
आम्ही मोठय़ा आशेने म्हस्केकडे पैसे दिले, मात्र त्याने आमची फसवणूक केली. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. म्हस्केकडून आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत. राज्यभरात म्हस्केने 100 पेक्षा जास्त तरुण-तरुणींना फसवले आहे. संदीप थोरात, तक्रारदार, फसलेला तरुण.