आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांपूर्वीचे डीडी स्कॅन करून दिले, व्यापाऱ्यांना फसवणाऱ्या भामट्याला काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नाशिक येथे माेठा बांधकाम व्यावसायिक असल्याची बतावणी करून भामट्याने शहरातील तीन दुकानदारांची २०१५ मध्ये फसवणूक केली हाेती. भामट्याने व्यापाऱ्यांना दिलेला डी. डी. हा ११ मार्च २०१० राेजीचा असून ताे स्कॅन करून त्याने दिला असल्याची माहिती तपासात पुढे अाली अाहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संशयित प्रफुल्ल जैन याची पाेलिस काेठडीची मुदत बुधवारी संपली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे. त्यानंतर त्याची रवानगी खंडवा कारागृहात करण्यात आली. 

प्रफुल्ल जैन, नेमीचंद जैन अाणि कमलेश जैन हे जैनम सॅनिटेशन, रणजित इलेक्ट्रॉनिक्स अाणि स्वामी प्लाझा या दुकानांमधून नमुने घेऊन गेले हाेते. दाेन दिवसांनी ते शहरात आले. त्यांनी एक मालवाहू रिक्षा भाड्याने घेतली. रिक्षाचालकाकडे डी. डी. देऊन साहित्य संबंधित दुकानदारांकडून घेऊन येण्यास सांगितले. रिक्षा चालकाने डी. डी. देऊन अाणलेले साहित्य एका ठिकाणी व्हॅनमध्ये ठेवून भामट्यांनी पाेबारा केला. दुकानदारांनी बँकेत डी. डी. टाकल्यानंतर तो बनावट असल्याचे समाेर अाले. 

पत्ताही निघाला खाेटा 
गुन्ह्याच्या तपासासाठी शहर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक दीपक गंधाले यांचे पथक प्रफुल्ल जैन याला घेऊन मुंबईत गेले हाेते. त्यांनी नवजीवन साेसायटीत जाऊन कमलेश जैन याचा तपास केला. मात्र, तो पत्ता खोटा निघाला. या वेळी पोलिसांना एक आधारकार्ड सापडले. त्यावर संशयिताचा अहमदाबादचा पत्ता असल्याने पोलिस अहमदाबादला रवाना झाले. 

१०३ रुपयांच्या डीडीचे केले स्कॅनिंग 
मुंबईयेथील लॅमिंगटन राेडवरील सिंडीकेट बँकेतून ११ मार्च २०१० राेजी नेमीचंद जैन याने जयंतीलाल जैन या नावाने १०३ रुपयांचा डी. डी. काढला हाेता. या डी. डी.चे स्कॅनिंग करून अहमदाबाद, खंडवा, जळगाव अाणि भुसावळच्याही व्यापाऱ्यांना गंडवल्याचे पाेलिस तपासात समाेर अाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...