आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: तिसगाव शिवारामध्ये एक-एक फ्लॅट दोन-दोन, तीन-तीन जणांना विकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अपार्टमेंट तयार होण्यापूर्वीच प्रत्येक फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले. पजेशनसाठी ठरवून दिलेली तारीख टळली तरीही बिल्डर रजिस्ट्री करून द्यायला तयार नाही... मग संशय आलेल्या ग्राहकांनी खोलात जाऊन माहिती घेतली असता या बिल्डरने एक, एक फ्लॅट चक्क तीन-तीन जणांना विकल्याची माहिती पुढे आली. डीबी स्टारच्या हाती हे प्रकरण आले. चमूने त्याचा सखोल तपास केला असता बिल्डर कैलास बारवाल याने जमीन मालकासह अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी काही जणांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्यापही गुन्हे दाखल होऊ शकले नाही. 

‘यशनिर्मिती’ प्रकल्प 
संध्यानरसिंग पडलवार, गोविंद लछीराम मुकिंदवाड अशोकराव सोनाजी देसाई यांचा तिसगाव शिवारात गट क्रमांक १८५ मध्ये ७९४.६४० चौरस मीटर अकृषक भूखंड होता. हा भूखंड त्यांनी मल्टिल्पायर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला विकसित करण्यासाठी दिला. या व्यवहाराची रीतसर नोंदणीकृत ‘डीड ऑफ डिक्लेरेशन’ही झालेली आहे. येथे टू बीएचके आणि वन बीएचके मिळून १६ फ्लॅटची स्कीम होती. यापैकी साडेसात फ्लॅट्स विक्रीचे अधिकार भूखंड मालकांना तर साडेसहा फ्लॅट्स विक्री करण्याचे अधिकार मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरला होते. सध्या या अपार्टमेंटचे अर्धे काम झालेले आहे. 

बँकेकडे तारण, तरीही दुहेरी विक्री 
मल्टिप्लायरइन्फ्रास्ट्रक्चरने तिसगावातील गट क्रमांक १८५ मधील यशनिर्मिती या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक बी-१, ३, ए-४, ६, ७, ८, १२ असे सात फ्लॅट मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला तारण ठेवून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडल्याशिवाय बँकेच्या परवानगीशिवाय फ्लॅट विकता येत नाहीत. मात्र, मल्टिप्लायरनेे बँकेला काहीच कळवता परस्पर फ्लॅट विक्री केले. याप्रकरणी बँकेने मल्टिप्लायरचे कैलास बारवाल शैलेश मनजीभाई पटेल यांना नोटीसही पाठवलेली होती. त्यानंतर बँक न्यायालयात गेली आणि काही काळाने या दोघांनी बँकेचे सर्व कर्ज चुकते केले. फसवणूक झालेले ग्राहक मात्र आजही बारवाल यांच्याकडे पैशांसाठी चकरा मारत आहेत. 

प्रकरण 1 : एप्रिल २०१४ रोजी मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरने गबरूलाल भाऊलाल कुमावत यांना फ्लॅट क्रमांक बी-१ ची नोंदणीकृत इसारपावती करून दिली. धनादेशाद्वारे लाख रुपये इसार म्हणून घेतले. इसार पावतीमध्ये धनादेश क्रमांकासह याचा उल्लेख आहे. त्यानंतर ११ मार्च २०१५ रोजी कैलास रोहिदास बारवाल यांनी याच फ्लॅटची कनील जितेश शहा सोनल जितेश शहा यांना रोख १५ लाख रुपये घेऊन इसारपावती बनवून दिली. 

प्रकरण 2 : डीड आॅफडिक्लेरेशननुसार बी-२ हा फ्लॅट जमीन मालकाच्या हिश्श्याचा होता. नियमानुसार हा फ्लॅट विकण्याचे अधिकार जमीन मालाकांनाच होते. मात्र, असे असतानाही मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक कैलास बारवाल यांनी नोव्हेंबर २०१४ रोजी हा फ्लॅट सोनल जितेश शहा शब्बीर मोटरवाला यांना १५ लाख रुपये रोखीने घेऊन इसारपावती करून दिला. हाच फ्लॅट त्यांनी पुन्हा जमिला बागवाला यांना पावणे तेरा लाख रुपये रोख घेऊन इसारपावती करून दिला. म्हणजे या प्रकरणात दोन्ही खरेदीदारांसह जमीन मालकांचीही फसवणूक झाली. 

प्रकरण 3: जानेवारी २०१५ रोजी याच इमारतीमधील ए-६ हा फ्लॅट कैलास बारवाल यांनी १५ लाख रुपये रोख घेऊन सुनील भोजा शेट्टी यांना इसारपावती करून दिला. २९ जानेवारी २०१७ पर्यंत फ्लॅटचे खरेदीखत करून ताबा देण्याचे इसारपावतीमध्ये नमूद केलेले होते. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी हाच फ्लॅट रशिदा शब्बीर मोटरवाला यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन त्यांना इसारपावती करून दिला. त्यांनाही दोन वर्षांमध्ये खरेदीखत करून ताबा देण्याचे इसारपावतीमध्ये नमूद केले होते. एकच फ्लॅट दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेला असताना पुन्हा २४ मे २०१६ रोजी बारवाल यांनी हाच फ्लॅट नितीन अरूण लाडवाणी यांना विकला. फ्लॅटपोटी लाडवाणी यांनी धनादेश आणि रोख असे मिळून साडेआठ लाख रुपये दिले होते. अशा पद्धतीने यात तिघांची फसवणूक झाली. 

प्रकरण 4 : २६ डिसेंबर २०१४ रोजी बिल्डरने ए-८ हा फ्लॅट बिभूती भूषण बानसिंदर पांडा बिनिता बिभुती भूषण पांडा यांना विकला. पांडा कुटुंबीयांकडून रोख धनादेशाद्वारे लाख २० हजार रुपये घेऊन नोंदणीकृत इसारपावती त्यांना बनवून दिली. हाच फ्लॅट पुन्हा ११ मार्च २०१३ रोजी बारवाल यांनी शब्बीर मोटारवाला रशिदा मोटारवाला यांना विकला. या व्यवहारापोटी मोटारवाला कुटुंबीयांकडून १५ लाख रुपये घेतल्याचे इसारपावतीमध्ये नमूद केलेले आहे. मोटारवाला यांची या फ्लॅटसह ए-६ या फ्लॅटमध्येही बारवाल यांनी फसवणूक केलेली आहे. 

प्रकरण 5 : फेब्रुवारी २०१५ रोजी ए-१२ हा फ्लॅट बिल्डरने मनमोहन पाल सिंग अहलुवालिया यांना १३ लाख रुपये इसार घेऊन विकला. तशी इसारपावतीही बनवून दिली. त्यानंतर २३ मार्च २०१५ रोजी हाच फ्लॅट रणजित किशोर पाटील यांना विकला. ११ हजार रुपये रोख इसार घेऊन पाटील यांना नोंदणीकृत इसारपावती बनवून दिली. 
 
तक्रार देऊनही पोलिसांची टाळाटाळ 
बारवाल हे आमचे मित्र होते. त्यामुळे आम्ही विश्वासाने त्यांच्या स्कीममध्ये फ्लॅट बुक केले. त्यासाठी वेळोवेळी पैसेही दिले. आम्हाला जेव्हा कळले, की आम्हाला दिलेला फ्लॅट अन्य काही व्यक्तींना विकल्याचे कळताच आमच्या पायाखालची वाळूच सरकली. आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 
- सुनील भोजा शेट्टी 
 
दोघांनाही नोटीस बजावली 
आमचा भूखंड विकसित करण्यासाठी मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरला दिला होता. त्यांनी फ्लॅट विकते वेळी आमच्या हिश्श्याचाही विकल्याचे कळल्यानंतर आम्ही मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरसह संबंधित खरेदीदारालाही कायदेशीर नोटीस बजावली आहे.
- संध्या नरसिंग पडलवार, भूखंडमालक
 
मेहुणे असल्याने ठेवला विश्वास 
कैलास बारवाल, विलास बारवाल हे माझे सख्खे मेहुणे (साले) आहेत. दोघांवर विश्वास टाकून आम्ही फ्लॅटचे बुकिंग केले होते. आता आम्हाला फ्लॅटही मिळेना आणि आमचे पैसेही मिळेनात. आम्ही वारंवार त्यांच्याकडे चकरा मारल्या, पण प्रत्येक वेळी आम्हाला काही ना काही बहाणा सांगितला जातोय.
- गबरूलाल कुमावत, फ्लॅट खरेदीदार 

थेट सवाल: कैलास बारवाल, बिल्डर 
 
एकाच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकल्याच्या तुमच्याविरुद्ध तक्रारी आहेत... 
>हासर्व व्याजबट्ट्याचा व्यवहार होता. माझ्या लहान भावाने अनेकांना इसारपावत्या करून दिल्या. तो भाऊही आता पळून गेलाय. त्याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. 

अनेक इसार पावत्यांवर तुमच्या स्वत:च्या स्वाक्षऱ्या आहेत... 
>माझीस्वाक्षरी केवळ गबरूलाल कुमावत यांच्याच इसारपावतीवर आहे. इतरांच्या इसारपावत्यांवर मी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. 

काही ग्राहकांनी मल्टिप्लायर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने चेक दिलेले आहेत. ती रक्कम तर तुमच्या फर्मच्या खात्यामध्ये जमा झालेली होती ना... 
>हो,बरोबर आहे. पण माझा छोटा भाऊ माझे एकत्रच कार्यालय होते. माझ्या कार्यालयात माझ्या स्वाक्षऱ्या असलेले काही कोरे चेक नेहमी असायचे. हे कोरे चेक माझ्या भावाने घेऊन त्यावर रक्कम टाकून स्वत:च्या खात्यावर वटवले. म्हणजे ग्राहकांचे पैसे आमच्या खात्यावर आल्यानंतर लगेच ते माझ्या भावाच्या खात्यावर गेले. 

आताज्या लोकांची फसवणूक झाली त्यांचे पुढे काय होईल? 
>माझाभाऊ ही सर्व फसवणूक करून पळून गेलाय. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 
बातम्या आणखी आहेत...