आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्ज्वला गॅस योजनेत लूट, दानवेंमुळे पैसे परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- येथील संत एकनाथ गॅस एजन्सीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या गॅस वाटपामध्ये गरीब लाभार्थींकडून १६०० रुपये घेत गॅसचे वाटप करण्यात आले. गुरुवारी काही लाभार्थींना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गॅस वाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र केवळ नाममात्र शंभर रुपये लाभार्थींकडून घेतले जावे, असा नियम असताना या गॅस एजन्सी चालकांनी लाभार्थींकडून १७०० रुपये घेतल्याची बाब रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आली. तेव्हा लाभार्थीकडून कोणत्या आधारे पैसे घेतले, असे म्हणत गॅस एजन्सीच्या मालकाला चांगलेच धारेवर धरले. तसेच पैसे परत देण्यास सांगितले. त्यामुळे ४० ते ५० लाभार्थींचे गॅस एजन्सी चालकाला पैसे परत करावे लागले.  

सर्वच गॅस एजन्सीवर उज्ज्वला गॅस  हा मोफत दिला जातो. मात्र पैठण तालुक्यातील गॅस एजन्सी मालक हे लाभार्थींकडून पैसे घेऊन गॅसचे वितरण करत असल्याची बाब समोर आली.
बातम्या आणखी आहेत...