आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या खात्यावरील रक्कम सासुने उचलली; वडवणीच्या स्टेट बँकेतील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/बीड- सुनेच्या नावावर असलेली 4 लाख 36 हजाराची रक्कम सासुने बनावट कागदपत्र तयार करून उचलल्याची घटना वडवणीच्या स्टेट बँकेत घडली आहे. याप्रकरणी सुनेने सासुविरूद्ध वडवणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

     वडवणीच्या भारतीय स्टेट बँकेत 8 ऑगस्ट रोजी विजयमाला दिगंबर गदळे (रा. वडमाऊली दहीफळ ता. केज) या महिलेने सुन कावेरी श्रीकांत गदळे (रा. कुर्ला, मुंबई) हिच्या भारतीय स्टेट बँक वडवणी शाखेतील खात्यातील 1 लाख 12 हजार 663 रूपये व विम्याचे असलेले 1 लाख 23 हजार 482 रूपये असे एकुण 4 लाख 36 हजार 145 रूपये बनावट कागदपत्र व खोट्या सह्या करून उचलली. सासुने खात्यावरील रक्कम उचलल्याने सुन कावेरी श्रीकांत गदळे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिस ठाण्यात 420, 468 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय व्ही. डी. भोसले हे करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...