औरंगाबाद - सात वर्षे एकत्र राहिल्यानंतर प्रेयसी गर्भवती राहिल्याने तिने विवाहासाठी आग्रह धरला. परंतु प्रेयसी गर्भवती राहिल्याचे कळताच प्रियकराने विवाहास नकार देत या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या महिलेने भीतीपोटी ऑगस्ट रोजी पोलिसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी लहू कडाजी नाटकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लहू तक्रारदार महिलेची २०१० मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्याने त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
परंतु महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे कळताच त्याने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याप्रकरणी त्याला जाब विचारला असता त्याने धमकावत या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.