आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली २७ हजार रुपयांचा घातला गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ऑनलाइन गंडा घालणाऱ्या हायटेक चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला अाहे. रविवारी काबरानगरातील एका कामगारास ऑनलाइन खरेदी करण्याची ऑफर देऊन २७ हजार ४९९ रुपयाचा गंडा घातला गेला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फौजदार भोसले यांनी सांगितले की, काबरानगर गारखेडा येथील गणेश गिरी हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना रविवारी ७.४५ च्या सुमारास ०१२०३८९३३०० या क्रमांकावरून मोबाइलवर फोन आला. मिड वे शॉपतर्फे ऑनलाइन खरेदी केल्यास काही निवडक ग्राहकांना बक्षिसे दिली जातील, बक्षिसासाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू मिडेशॉप. कॉम या वेबसाइटवर ऑनलाइन लॉगिन करावे लागेल, असे फोनवरून सांगण्यात आले. नंतर गिरी यांच्या बँक खात्याची माहिती विचारून घेतली. गिरी यांनी वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर त्यांची २७ हजार ४९९ रुपयांची ऑनलाइन खरेदी झाली. हा प्रकार कळल्यानंतर गिरी यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. तपास सुरू केल्याची माहिती भोसले यांनी दिली.
नागरिकांनी सावध व्हावे
ऑनलाइनगंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. ही माहिती माध्यमांमध्येही येते. तरीसुद्धा आपल्याला फोन आल्यानंतर स्वत:च आपण आपली सर्व माहिती देतो आणि आपली फसवणूक करून घेतो. नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.