आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेबिट कार्डचा कोड हॅक; 41 हजारांची फसवणूक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गरवारे स्टेडियमशेजारील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असणार्‍या आदर्श सुरेश जैस्वाल (24) यांच्या डेबिट कार्डचा गोपनीय कोड हॅक करून मुंबईतील भामट्याने 41 हजारांचा मोबाइल खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. बँकेकडून माहिती मागवून फसवणूक करणार्‍याचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जैस्वाल यांचे काल्डा कॉर्नर येथील एचडीएफसी बँकेत खाते आहे. त्यांच्या कार्डचा गोपनीय कोड हॅक करून मुंबईच्या घाटकोपर परिसरातील रमानगरात राहणार्‍या आशिष नावाच्या भामट्याने ‘के’ मोबाइल गिफ्ट शॉपीमधून 22 सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास 41 हजारांचा मोबाइल खरेदी केला.