आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी 50 हजार रुपये , थातूरमातूर प्रशिक्षण, एकालाही मिळाला नाही रोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थ्याच्या नावावर आदिवासी विकास विभागाने जाणता राजा मल्टिपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला तब्बल ५० हजार रुपये दिले. विशेष म्हणजे प्रशिक्षण केवळ दहा ते बारा दिवसांचेच आणि थातूरमातूर. अशा पद्धतीने आदिवासींच्या नावाने काढलेल्या योजनेतून पैसे उकळले तर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कधी येईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्याचे एखाद्या पदवीचे शिक्षण ५० हजार रुपयांमध्ये होऊ शकते. इथे मात्र दहा ते बारा दिवसांच्या प्रशिक्षणावर तेवढी रक्कम खर्च केली जात आहे. प्रशिक्षणानंतर किमान काही विद्यार्थ्यांना नोकरी लागली असती तर हे प्रशिक्षण खरोखर उच्च दर्जाचे आहे, असे समजता आले असते. मात्र, थातूरमातूर प्रशिक्षणानंतर एकाही विद्यार्थ्याला नोकरी लागली नाही. 

डीबी स्टार चमूने जेव्हा या विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा फार विदारक चित्र समोर आले. ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लागली असे भासवण्यात आले, त्यांच्या भेटी घेऊन ते सध्या नेमके काय करत आहेत, याचा शाेध चमूने घेतला. यात सर्वाधिक विद्यार्थी शेतमजूर म्हणून काम करताना आढळून आले. पैठण तालुक्यातील चोंढाळा येथील योगेश्वर दळवे या विद्यार्थ्याला वॉर्डबॉयचे प्रशिक्षण देऊन एका हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून दहा हजार रुपये पगरावर नोकरी लागल्याचे दाखवले. प्रत्यक्षात हा तरुण चितेगाव येथे एका पुठ्ठा उत्पादन कंपनीत गठ्ठे उचलण्याचे काम करतो. याशिवाय परतूर भोकरदन तालुक्यातील तरुण-तरुणींनी काय सांगितले, ते या प्रशिक्षणाची पोलखोल करण्यासाठी पुरेसे आहे. 

रोजगार नाहीम्हणून आज लोकांच्या शेतात मजुरीसाठी जावे लागत आहे. ट्रेनिंग दिल्यानंतर मला नोकरी लागेल असे सांगण्यात आले होते. आता एक वर्ष झाले वाट पाहत आहे. आमच्या गावातली अशा बऱ्याच मुला-मुलींची शासनाने थट्टा केली.
- पोखरखोबराजी काळे 

कुणालाच नोकरी नाही मिळाली 
चौकशी पूर्ण झाली आहे. ज्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावल्याचे दाखवले आहे, त्या उमेदवारांचे जबाब घेतले आहेत. दहा ते पंधरा दिवस प्रशिक्षण दिल्याचे उमेदवार सांगतात. यातील कुणालाच नोकरी लागलेली नसल्याचे चौकशीत आढळून आले. चौकशी अहवाल तयार केला असून वरिष्ठांना पाठवला आहे.
- दिलीप खोकले, चौकशीअधिकारी 

पुढील स्लाइडवर वाचा काय म्हणाले विद्यार्थी...?
बातम्या आणखी आहेत...