आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे काढायला गेलेल्या मुलाला फसवून पावणेदोन लाख लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढून देण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करण्यात आली. भामट्याने मुलाकडून एटीएम कार्ड घेऊन त्यातून रक्कम काढली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले की, मुकुंदवाडी येथे १५ वर्षांचा मुलगा आणि त्याची आई दोघेच राहतात. त्याच्या आईच्या नावावर एसबीआयचे एटीएम कार्ड आहे. सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भाजी मंडईनजीकच्या एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी हा मुलगा गेला होता. त्याने २० हजार रुपये काढले, पण पैसे काढल्याची पावती मशीनमधून बाहेर येत नसल्यामुळे मुलगा तेथेच मशीनचे बटण दाबत उभा होता. हा सगळा प्रकार एक भामटा बाहेर उभा राहून पाहत होता. काय रेे बाळ, काय अडचण आहे, असे तो मुलाला म्हणाला. मुलगा म्हणाला, काका मशीनमधून पावतीच येत नाही. किती पैसे काढले हे आईला कसे कळेल. घाबरू नकोस, मी तुला पावती काढून देतो असे म्हणत भामट्याने हर्षलच्या हातातून एटीएम कार्ड घेतले आणि पावती काढून दिली.
दरम्यान, मुलाने एटीएमचा कोड भामट्याला सांगून टाकला होता. पावती दिल्यानंतर भामट्याने हातचलाखीने हर्षलचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले आणि हुबेहूब दुसरे कार्ड त्याच्या हातात ठेवले आणि तो तेथून निघून गेला. वाटेल तेव्हा या भामट्याने हर्षलच्या आईच्या एटीएमवरून टप्प्याटप्प्याने लाख ८५ हजारांची रक्कम काढून घेतली. एटीएममधून रक्कम काढल्याचे मेसेज हर्षलच्या मामाच्या मोबाइलवर जात होते. मामा कोल्हापूर येथे राहतात. मोठी रक्कम काढल्यामुळे मामांना शंका आली आणि त्यांनी आपल्या बहिणीला मोबाइलवरून विचारले. आम्ही तर केवळ २० हजार रुपयेच काढले, त्याव्यतिरिक्त एकही रुपया काढलेला नाही, असे त्यांनी सांगितले. हे ऐकताच मामांनी औरंगाबाद गाठले आणि बँकेत जाऊन चौकशी केली. मुलाकडे असलेले एटीएम कार्ड बोगस असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी मामांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक नाथा जाधव करत आहेत.
औरंगाबाद एटीएममध्येपैसे टाकण्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने बँकेकडून देण्यात आलेले पैसे एटीएममध्ये भरता खिशात घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा कंत्राटदार तीन वर्षांपासून घोळ घालत होता. नांदेड, जळगाव जिल्ह्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी औरंगाबादमध्ये मुख्य कंत्राटदार अर्जुन वऱ्हाडे (रा. औरंगाबाद) यांच्यासह त्याचे कर्मचारी अमोल आखाडे सूरज अंभोरे यांच्या विरोधात क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुंबईस्थित एका कंपनीला एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीतर्फे वऱ्हाडे यांच्या अॅक्टिव्ह सिक्युअर कंपनीला औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर शहरांचे काम देण्यात आले होते. परंतु २०१३ ते २०१६ दरम्यान वऱ्हाडे यांनी बँकेतर्फे आलेल्या पैशांपैकी काही ठरावीक टप्प्यांमध्ये पैसे काढून घेतले. ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर चौकशी केली असता व्हराडे यांनी देण्यात आलेल्या रकमेपैकी अर्धीअधिक रक्कम मशीनमध्ये टाकलीच नसल्याचे समाेर आले. नांदेड, जळगाव येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार औरंगाबादमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आयकर अधिकाऱ्यास फसवण्याचा प्रयत्न
आयकर विभागात वरीष्ठ अधिकारी रुबी श्रीवास्तव (५४, रा. आयकर भवन परिसर, छावणी) यांना सप्टेंबर रोजी भामट्याने मेलवर संपर्क साधत बँक खात्याची माहिती मागितली. त्यानंतर त्याच्या खात्याचा क्रमांक देत त्यात लाख ४५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. परंतु भामट्याचा उद्देश लक्षात येताच श्रीवास्तव यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक साळवे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...