आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:च्या फोटोला हार घालून जीवन संपवले, उच्चशिक्षित तरुणाची मिसारवाडीत आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली...’या सुरेश भटांच्या गझलेच्या ओळी शशिकांतच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आठवल्याशिवाय राहत नाहीत. एमएस्सीपर्यंत शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे या तरुणाने स्वत:च्या फोटोला पुष्पहार घालून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ मे रोजी मिसारवाडीत घडली. शशिकांत मंताराम बनसोडे (२४) असे या तरुणाचे नाव आहे.

शशिकांतने हलाखीच्या परिस्थितीत मौलाना आझाद कॉलेजमधून एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. सहा दिवसांपूवीच त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली. पण पगार तुटपूंजा होता, म्हणून त्याने नैराश्यातून आत्महत्या केली. १८ मे रोजी शशिकांतच्या गावाकडील नव्या घराची वास्तुशांती होती. त्यामुळे त्याचे कुटुंबीय गावाकडे गेले होते. शशिकांत मात्र घरीच होता. मृत्युपूर्वी बुद्धविहारात जाऊन वंदना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. एका मित्राला व्हाॅट्सअॅपवर ‘उद्या मी या जगात नसेल तरीही माझा नंबर तुझ्या मोबाइलमध्ये नक्की असेल’ असा मेसेज केला. त्यानंतर त्याने स्वत:चा फोटो दरवाजावर चिकटवला. त्याला पुष्पहार घातला आणि गळफास घेतला. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली. तपास पोलिस नाईक रामेश्वर कदम करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...