आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामिनी पथकातर्फे मोफत कराटे प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिस आयुक्तालय आणि दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आले. सिडको एन-८ येथील वेणुताई चव्हाण प्रशालेत झालेल्या शिबिराचे उद्घाटन पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी वेणुताई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शशी नीलवंत होत्या. कार्यक्रमाचे संयोजन दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक नीता मिसाळ यांनी केले. या वेळी वेणुताई चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये मयूरी चायल, पूजा हिवाळे, रिजवाना पटेल, प्रतीक्षा कासाटे, इरफाना शेख, सोनाली गवळी यांचा समावेश होता. कराटे प्रशिक्षक म्हणून रामेश्वर चायल व महिला प्रशिक्षक म्हणून अश्विनी चायल यांची नियुक्ती करण्यात आली.शाळा-महाविद्यालयातील पाचशेवर मुलींना पोलिस आयुक्तालय व दामिनी पथकाच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त परदेशी यांनी सांगितले.