आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Medicines To All Patients In Government Hospitals From Today

सरकारी रुग्णालयांत सर्वांनाच मोफत औषधे, योजनेला प्रारंभ औरंगाबादेतून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय निर्णयांच्या मालिकेत राज्य सरकारने आता मोफत औषधांचा निर्णय जोडला आहे. यानुसार राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयात प्रत्येक रुग्णाला मोफत औषधे दिली जातील. दोन ते तीन दिवसांत या योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ औरंगाबाद येथे करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.
केंद्र सरकारचे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राज्य सरकार यांच्या वतीने संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील जिल्हा, ग्रामीण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीस येणार्‍या सर्व रुग्णांना यापुढे डॉक्टरच थेट औषधे देतील. रुग्णाला उत्पन्नाची वा अन्य कोणतीही अट लागू करण्यात आलेली नाही. मात्र उपचार खासगी रुग्णालयात आणि औषध सरकारी रुग्णालयातून हा प्रकार चालणार नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
सर्व रुग्णालयांमध्ये कर्करोगाला लागणारी औषधेही मोफत मिळतील. एकूण 429 प्रकारची औषधे या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. सुमारे 400 कोटींहून अधिक खर्च करून औषध खरेदी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक जिल्हाशल्य चिकित्सकाकडे 15 लाख रुपये देण्यात आले आहेत. तुटवडा भासल्यास कोणत्याही आवश्यक औषधांची खरेदी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत, असे शेट्टी म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, औरंगाबादेतून प्रारंभ