आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त मैत्री दिनाचे: एक दिवस मैत्रीचा आणि त्या पलीकडचाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत: ला मित्र - मैत्रिणी असण एक अभिमानाची गोष्‍ट असते. मैत्रीच्या विश्‍वात शोले, थ्री इडियटस् , काय पो छे, बिनधास्त ही चित्रपट ने‍हमी स्मरणात राहतात. कारण आपण आपला मित्रा त्या चित्रपटातील पात्राच्या माध्‍यमातून शोधत असतो. मैत्रीला वय, मर्यादा, पात्रता, निकष, नियमावली नसते. तिथे अट असते फक्त निखळ प्रेमाचे. कॅन्टीन, कॉलेज कट्टा, वर्गात शिक्षकाचे व्याख्‍यान अशाप्रसंगी केलेले मजेशीर किस्से नेहमी आपल्या स्मरणता कोरले जातात. आपल्या प्रत्येक शिक्षकाची नक्कल करणं, एकमेंकांना आधार देणं हे सर्व मैत्रीच्या विश्‍वात चालत असते.

मित्राला कधीही सरळ नावाने हाक न मारता आपल्याला विशिष्‍ट प्रसंगी आठवलेले नाव त्याला आपण बहाल करतो. असं सर्व चालू असताना समविचारी मित्र एकत्र येऊन गुगल, इन्फोसिस सारखे प्रयोग करतानाही दिसतात. मित्र लांब असो किंवा जवळ संपर्क साधनांच्या माध्‍यमातून तो चोवीस तास त्याच्या संपर्कात असतो. मैत्री ही एका विशिष्‍ट क्षणापुरते नसते. ती आयुष्‍याच्या प्रत्येक पावलावर सतत तेवत असते.