आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बदतमीज दिल’ स्टाइलने होणार फ्रेंडशिप डे साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणजेच फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा केला जाणार आहे. सुटीचा दिवस असला तरी शाळा-महाविद्यालयांतील मित्र-मैत्रिणींची मैफल कट्टय़ावर जमणारच! हा मित्रांचा कट्टा फ्रेंडशिप डेला काय बरे करणार, याविषयी ‘दिव्य मराठी’ने काही विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

फ्रेंडशिप डे रविवारीच येत असल्याने काही मित्रांनी शाळा-महाविद्यालयात सोमवारी धमाल करण्याचा बेत आखला आहे. अनेकांनी पार्टीचा किंवा सहलीवर जाण्याचा बेत आखला आहे.

दोन वेळा करणार सेलिब्रेशन : नारायण चव्हाण याने सांगितले की, रविवारी वर्गातील सर्वजण भेटणार नाहीत. म्हणून आम्ही ग्रुपमधील फ्रेंड्ससोबत केक काूपन धम्माल करू आणि सोमवारी सर्व वर्गमित्र मिळून हा दिवस साजरा करणार आहोत. आमचे दुहेरी सेलिब्रेशन राहणार आहे.

थीम बेस स्टाइल : राहुल वाघ याने सांगितले की, आम्हा मित्रांचे सेलिब्रेशन एकदम ‘ये जवानी है दीवानी’ सिनेमा स्टाइल असेल. सर्व मित्र एकच ड्रेस अर्थात व्हाइट कपड्यांमध्ये सोमवारी कॉलेजला जाणार आहेत. तेव्हा आम्ही समोसा विथ आइस्क्रीम पार्टी करणार आहोत. तीदेखील दोस्तों के नाम ‘बदतमीज दिल’ स्टाइलने.

शाळेच्या मैत्रिणींसोबत : नुकत्याच कॉलेजच्या कट्टय़ावर प्रवेश केलेली अकरावी कॉर्मस शाखेची सलोनी पाटणी ही आपल्या शालेय मैत्रिणींसोबतच हा दिवस साजरा करणार आहे.

मस्ती आणि मनोरंजन
कार्तिकी पोतदार म्हणाली, माझे सेलिब्रेशन खूप हटके असेल, कारण आम्ही सर्व मुलींचा ग्रुप मिळून मस्ती आणि मनोरंजन करणार आहोत. यात मग खूप सारी चॉकलेट्स देऊन एकमेकांच्या नकलाही केल्या जाणार आहेत.