आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • From 21 August Three Days 25 Thousand Autorikshow Go On Strike In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद शहरात 21 ऑगस्टपासून तीन दिवस 25 हजार रिक्षा राहणार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील सुमारे 25 हजार रिक्षाचालक 21 ते 23 ऑगस्टदरम्यान संपावर जाणार आहेत. यात शालेय वाहतूक करणार्‍या 600 पेक्षा अधिक रिक्षांचा समावेश आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने 150 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला.

हकीम समितीचा अहवाल सादर करून दोनपेक्षा अधिक वर्षे झाली तरीसुद्धा तो अमलात आणण्यात आला नाही. त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत निसार अहमद, श्रा वण कदम, बाबा कुरेशी, निसार अहेमद आदींचा सहभाग होता.

उपनगरासाठीही बस सुविधा : जिल्ह्यातील डेपोत एकूण 600 बसेस आहेत. वेळ पडल्यास यातील 150 बसेस शहर वाहतुकीसाठी वापरता येतील. त्याचप्रमाणे पुणे, जालना, बीड, सिल्लोड भागात जाणार्‍या बस बजाजनगर, हसरूल, चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी आदी शहराच्या उपनगरात सुविधा पुरवतील. निर्धारित वेळेपेक्षा गाड्यांच्या अधिक फेर्‍या होऊ शकतात, असे महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर म्हणाले.


काय आहेत मागण्या ?
ऑटोरिक्षा चालक, मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करू नये, विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, ऑटोरिक्षांची आयुर्मयादा अमर्याद असावी, प्रत्येक जिल्ह्यात सीएनजी, एलपीजीची सुविधा असावी आदी मागण्यासांठी संप पुकारण्यात आला.