आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Aurangabad Export, Cargo Facility Starts At Chikalthana Airport

अाैरंगाबादेतून अाता थेट निर्यात, चिकलठाणा विमानतळावर सुरू होणार कार्गो सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - अबकारी विभागाने चिकलठाणा विमानतळास कार्गो सुविधेचे प्रमाणपत्र बहाल केलेे. त्यामुळे उत्पादकांना मुंबईला न जाता आैरंगाबादहून सरळ आपले उत्पादन निर्यात करता येईल. ही सुविधा जूनपासून सुरू होईल, असे बुधवारी आयोजित कार्यक्रमात सांगण्यात आले.

मराठवाड्यातील माल सरळ विदेशात पाठवण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी चिकलठाणा विमानतळास परवानगी दिल्याचे अबकारी विभागाचे आयुक्त कुमार संतोष यांनी जाहीर केले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे चेअरमन राम भोगले, कार्गोचे व्यवस्थापक बी. के. मल्होत्रा, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जे. साळवी, विनोद पुनियाल, सीएमआयएचे उपाध्यक्ष आशिष गर्दे आदी उपस्थित होते. चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून मालवाहतूक करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध असल्याचे साळवी यांनी सांगितले. कार्गो सुविधेमुळे उत्पादकांच्या उत्पादनाची संपूर्ण तपासणी येथेच होईल. अबकारी विभागानेही कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पुन्हा मुंबईला तपासणी करण्याची गरज नाही. यामुळे औरंगाबादच्या उत्पादकांची होणारी परवड यामुळे थांबणार आहे.