आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबाद फिल्म फाउंडेशनचे वर्ल्ड सिनेमा प्रदर्शन रविवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - आैरंगाबाद फिल्म फाउंडेशनच्या वतीने रविवारी (१० एप्रिल) सायंकाळी वाजता टाऊन हॉल (महापालिकेच्या बाजूला) येथे वर्ल्ड सिनेमा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आैरंगाबादसारख्या कला संस्कृतीने नटलेल्या भागात सिनेमा संस्कृती निर्मितीसाठी हे प्रदर्शन भरवले जात आहे. या अभ्यासपूर्ण प्रदर्शनामध्ये बायोस्कोपपासून ते अद्यावत डी सिनेमामध्ये काळानुसार होत गेलेला बदल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामधील पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र, आवाजपट आलमआरा असे सिनेमातील बदल जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची माहिती मिळेल.
प्रदर्शनाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, शहराचे महापौर त्र्यंबक तुपे, मनपा आयुक्त आेमप्रकाश बकोरिया, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश द. रा. शेळके, प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन फिल्म फाउंडेशनचे संस्थापक संचालक आनंद देवरे, समन्वयक संदीप कांबळे, सतीश वाघुले, अंकुश चव्हाण यांनी केले आहे.