आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय प्रवेश आजपासून सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औद्योगिकी प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया १५ जून रोजी सुरू करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती थांबवण्यात आली होती. आता सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारपासून (२७ जून) अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती आयटीआयच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदा आयटीआय प्रवेशाच्या सहा फेऱ्या होणार आहेत. २७ जूनपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होईल. १० जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यात ८२ शासकीय तर ३६ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. आतापर्यंत प्रवेशासाठी चार फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी अशा एकूण पाच प्रवेश फेऱ्या होत असत. यंदापासून प्रवेशाच्या सहा फेऱ्या होणार आहेत. तसेच पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक लक्षात घेत विद्यार्थ्यांची संधी हुकणार नाही, याची काळजी घेऊनच आयटीआयचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
> २७जून ते १० जुलै : अर्जनोंदणी
> २७जून ते ११ जुलै : प्रवेशअर्ज शुल्क भरून निश्चित करणे
> प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून सादर करायची आहे.
> प्राथमिक गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर होईल.
> याच दिवशी सायंकाळी पर्यंत अर्जातील त्रुटी दुरुस्त करता येतील.
> १४ जुलै रोजी पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व्यवसायनिहाय निवड यादी जाहीर.
बातम्या आणखी आहेत...