आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन, असा राहील पाऊस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद  - अरबी समुद्रावरून येणारे शुष्क वारे, हवेचा वाढलेला दाब, ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराच्या तापमानात सातत्याने अडथळे यामुळे हमखास पावसाच्या जुलैमध्ये पावसाने राज्यात विश्रांती घेतली. मागील ३ आठवडे अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या समुद्रांचे तापमान सातत्याने सामान्य राहिले. त्यामुळे या समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यातील बाष्पातील प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले.
 
मात्र, गुरुवारपासून पावसाचा हा रुसवा संपणार असून राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
 
१३ ते २० जुलै : कोकण, मुंबईत मुसळधार, प. महाराष्ट्र, विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी चांगला पाऊस, नाशिक, नंदुरबार व आसपासच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होईल.  
जुलैचा शेवटचा आठवडा : महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस, धरणे भरण्यासाठी उपयुक्त
 
मान्सून पुन्हा सक्रिय होणार
मध्य महाराष्ट्र, कोकण ते तेलंगण, विदर्भ आणि मराठवाडा या भागावर हवेचा दाब जास्त होता. हा दाब आता कमी होऊन १००२ हेप्टापास्कल इतका होत आहे. 
- कोकण ते केरळपर्यंत आता कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण झाल्याने १३ जुलैपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ 
बातम्या आणखी आहेत...