आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीचे दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन आजपासून भरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा यासारख्या ऐतिहासिक वास्तंूमुळे औरंगाबाद शहराची ओळख जागतिक स्तरावर झाली आहे. शहरातील पर्यटनस्थळे, कलात्मक वास्तूंचे सौंदर्य चित्रकार रोहित गिरी यांनी कॅन्व्हॉसवर उतरवले आहे. विविध पर्यटनस्थळांच्या ९० चित्रांचे कल्चरल हेरिटेज प्रदर्शन गुरुवारी, २५ जून रोजी सकाळी १० वाजता बलवंत वाचनालयात भरवण्यात येणार आहे.
व्यंकटकेशनगरात राहणारे रोहित गिरी मागील बारा वर्षांपासून मुलांना शिकविण्याबरोबरच सामाजिक विषयांवर मुलांकडून चित्र काढून घेतात. त्या चित्रांचे प्रदर्शन भरवतात. स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा यासह इतर ३८ विषयांवर चित्रे काढण्यात आली आहेत. मागील वर्षी समाजसुधारक स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर आधारित चित्रे रेखाटली आहे. रोहित गिरी यांनी श्रीकृष्ण जन्मापासूनची चित्रे, डिस्नेची कथा यासह इतर नैसर्गिक कलाकृती रेखाटली आहेत.
पर्यटनस्थानांचे दर्शन घडवणारे प्रदर्शन २५ ते ३० जूनदरम्यान बलवंत वाचनालयात सकाळी १० ते रात्री वाजेदरम्यान सर्वासाठी खुले राहणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या वयोगटातील मुलांकडून ऐतिहासिक स्थळे वास्तूंची चित्रे रेखाटून घेतली.

अॅक्रलिक रंगाचा वापर करून रेखाटण्यात आलेल्या कलाकृतींतून शहराचे दर्शन घडते. यात वेरूळ अजिंठा, पाणचक्की, बीबी-का मकबरा, गजानन महाराज मंदिर, विमानतळ, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, पैठण येथील संगीत उद्यानातील कारंजे, भडकल गेट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यासह इतर अनेक कलाकृती रेखाटण्यात आली आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रोहित गिरी यांनी दहा ते बारा मुलांना मोफत चित्रकलेचे प्रशिक्षण दिले आहे. औरंगाबाद शहरात अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत त्यासाठी त्यांची सुरुवातीला फोटोग्राफी करून घेतल्यानंतर कॅन्व्हॉसवर कलाकृती रेखाटली आहे.
- शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणारी अनेक पर्यटनस्थळे, वास्तू असून यात मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळाले. या मुलांनी काढलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन भरविले जात आहे.
रोहित गिरी, चित्रकार
बातम्या आणखी आहेत...