आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून 'माझी सिटी टकाटक'चा शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वच्छ,सुंदर आणि कचराकुंडी मुक्त औरंगाबाद शहरासाठी मनपा, सिव्हिक रिस्पॉन्स टीम आणि सीआयआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "माझी सिटी टकाटक' मोहिमेचा प्रारंभ रविवारी २४ जानेवारी रोजी होत आहे. मोहिमेअंतर्गत सकाळी ते ९:३० वाजेपर्यंत शहरातील ठिकाणी केवळ कोरडा कचरा उचलला जाईल. मनपाच्या ७८ शाळांसह महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यात सहभागी होतील. यानंतर दर महिन्याला १२ वॉर्ड कचरामुक्त करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवला जाईल.
महानगरपालिका, सिव्हिक रिस्पॉन्स टीम आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमाने "माझी सिटी टकाटक'मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जानेवारीपासून सीआरटीचे स्वयंसेवक वॉर्डावॉर्डातील स्वच्छता कर्मचारी, जवान आणि नागरिकांचे प्रबोधन करत आहे. रोज सकाळी घरोघरी जाऊन कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाणार आहे. पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशन आणि व्हिडीओ फिल्म्सद्वारे हे प्रबोधन केले जात आहे.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा
या मोहिमेसाठीआम्ही गेले २० दिवस मेहनत घेतली. आता याची अधिकृत सुरुवात रविवारी होत आहे. आपले शहर स्वच्छ, संुदर आणि कचरा मुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. यात अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन अस्वच्छते विरुद्धची एकजूट दाखवून द्या. -सनवीर कौर छाबडा, सीआरटी

रविवारी महास्वच्छता
जानेवारीच्या एक तारेखपासून प्रबोधनाचा कार्यक्रम राबवल्यानंतर २४ जानेवारी रोजी सकाळी ते ९:३० दरम्यान "माझी सिटी टकाटक मोहिमेची औपचारिक सुरुवात होणार आहे. यात महानगरपालिकेच्या ७८ शाळा तसेच जेएनईसी, एमजीएम, एमआयटी, देवगिरी महाविद्यालय, पीईएस कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. याशिवाय रूद्र प्रतिष्ठान आणि दी अग्ली औरंगाबादकर्सचे स्वयंसेवक या मोहिमेत शहर स्वच्छ करतील. सर्व सहभागी शाळा आणि महाविद्यालयांना प्रमाणपत्र दिले जाईल. सहभागी होणाऱ्यांना हंॅड ग्लोव्हज आणि एक पोते दिले जाणार आहे.

येथे होणार स्वच्छता
बिबीका मकबरा, काबरा गार्डन, पैठण गेट, एन-५ कम्युनिटी सेंटर, वेदांतनगर, नागेश्वरवाडी, कॅनाट प्लेस, विष्णुनगर. या मोहिमेत रस्त्यावर पडलेला सुका कचराच वेचला जाईल. हा कचरा नारेगावात पोहाेचवता तो कचरा वेचक महिलांना दिला जाणार आहे. तेथून तो रिसायकल करण्यासाठी पाठवला जाणार आहे. यानंतर दर महिन्याला १२ वॉर्डांत अशा पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवून तेथे कचऱ्याच्या वर्गीकरणाचे महत्त्व विशद केले जाईल. सुरुवातीला रामनगर, विठ्ठलनगर, गुलमोहर कॉलनी, नागेश्वरवाडी, राजाबाजार, विष्णुनगर, एन-३, एन-४, वेदांतनगर, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी आणि एन-८ गणेशनगर आदी.