आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fruit Of Andhra Pradesh Increases Test Of Iftar Party

आंध्र प्रदेशातून येणार्‍या पपईने इफ्तार पाटर्य़ांची रंगत अन् लज्जत वाढली !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रमजान महिन्यातील उपवासामुळे फळांची मागणी दुपटीने वाढली असून त्या प्रमाणात फळांची आवकही वाढली आहे. आंध्र प्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात पपईची आवक होत आहे. रुचकर पपयांमुळे इफ्तार पाटर्य़ांची लज्जत वाढली आहे. पावसाळ्यातही टरबूज आणि खरबुजांची आवक होत आहे. वाढत्या मागणीमुळे व्यापार्‍यांकडून चढय़ा भावाने फळांची विक्री केली जात आहे.

गुरुवारपासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू झाले असून सकाळी सहर आणि रात्री इफ्तारसाठी फळांची मागणी वाढली आहे. खजुराला अधिक मागणी आहे. ऐन पावसाळ्यातही खरबूज आणि टरबूज उपलब्ध आहेत. या वर्षी सफरचंदांची आवक वाढली आहे. दरवर्षी 40 ते 50 क्विंटल आवक होत असे. यंदा दररोज 90 ते 100 क्विंटल सफरचंद येत असून दरही 150 ते 200 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आंब्याची आवक आणि दरही घसरले आहेत. 20 रुपये किलो दराने आंबे उपलब्ध आहेत. चिकू, मोसंबी, डाळिंबालाही चांगलाच भाव आला आहे.

फळांची आवक व दर
सफरचंद : सिमला, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातून येत असून त्यांची आवक 90 ते 100 क्विंटल, तर दर 150 ते 200 रुपये किलो असे आहेत.
पपई : आंध्र प्रदेश, नांदेड, परभणी येथून पपईची आवक होत असून दररोज 90 ते एक टनापर्यंत आवक होत आहे. दर 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे आहेत.
खजूर : नाशिक आणि येवला येथून प्रामुख्याने येत असून 15 ते 20 क्विंटल आवक होत आहे. त्याला 35 ते 40 रुपये किलोप्रमाणे भाव आहे.

0 डाळिंब : कन्नड, नाशिक, श्रीरामपूर आणि नेवासा येथून येत आहेत. दररोज 19 क्विंटल आवक असून दर 60 रुपये किलो मिळत आहे.
0 चिकू : औरंगाबाद, कन्नड, दौलताबाद, गुजरात येथून 20 क्विंटल आवक, 20 रुपये किलो भाव
0 जांभूळ : चौका, जटवाडा, पैठण येथून तीन क्विंटल येत आहेत. त्यांना 50 रुपये किलो भाव मिळत आहे.
0 टरबूज व खरबूज : बीड, उस्मानाबाद, नांदेड येथून प्रत्येकी 24 ते 25 क्विंटल येत असून त्यांना 15 ते 20 रु. किलो भाव मिळतो.

मागणीमुळे दरही वाढले
शहरात रमजानमुळे फळांची मागणी वाढली आहे. आवक कितीही असली तरी या दिवसात फळांचे दर वाढलेलेच असतात. कचरू सोनवणे, फळ विक्रेता, औरंगपुरा

चढय़ा भावाने विक्री
रमजानमध्ये मोठय़ा प्रमाणात फळांना मागणी असते. आवक जास्त असूनही व्यापार्‍यांकडून चढय़ा भावाने विक्री केली जाते. दोन महिन्यांत सर्व फळांचे दर पुन्हा कमी होतील. एस. एस. बनसोड, बाजार निरीक्षक