Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Fulambri, Aurangabad, Gharkul, Rajiv Gandhi Gharkul Yojana

घरकुल योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास बँका उदासीन

प्रतिनिधी | Sep 23, 2011, 07:05 AM IST

  • घरकुल योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास बँका उदासीन

फुलंब्री: सर्वसामान्य माणसाला हक्काचे घरकुल मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी घरकुल योजना राबवली. या योजनेंतर्गत मंजूर झालेली प्रकरणे कर्जासाठी शासकीय बँकांना पाठवली जात आहेत. मात्र, प्रशासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात बँका उदासीन असल्याचे समोर आले आहे. यामुळे गरिबांना हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या योजनेंतर्गत गरिबांना एक लाख रुपयांचे कर्ज देऊन घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. यासाठी लाभार्थीने 10 हजार, तर बँकेने 90 हजार रुपये द्यावेत, असा नियम आहे. या कर्जाची फेड 20 वर्षांची असून लाभार्थीला साडेसातशे स्क्वेअर फुटांची जागा लागते. या योजनेंंतर्गत फुलंब्री पंचायत समितीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे जवळपास 311 प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी 219 प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे, तर काही प्रस्ताव बँकेने काही कारणास्तव प्रलंबित ठेवले आहेत.
जागांची अडचण
काही प्रस्ताव केवळ जागेअभावी प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात जागेची अडचण आहे. साडेसातशे स्क्वेअर मीटर जागा असेल तरच बँका प्रस्तावांना मंजुरी देत आहेत. बँकांनी 157 प्रस्तावांपैकी केवळ 42 प्रस्ताव मंजूर केले. उर्वरित प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत यासाठी बँकेच्या प्रदेश कार्यालयाशी बोलणी झाली आहे.
राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

Next Article

Recommended