आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘देवगिरी’वर शेतकरी संघटनेचा मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री: देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करावा, कामगारांना पगार देण्यात यावा या मागण्यांकरिता शेतकरी संघटना व कामगार तसेच शेतकर्‍यांनी कारखान्यावर धडक मोर्चा काढला.
शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष तांदळे यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी खुलताबाद टी पॉइंट ते देवगिरी साखर कारखाना असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास तवार, जिल्हाध्यक्ष जी.पी.कदम, कामगार नेते उद्धव भवलकर, युनियन अध्यक्ष काशिनाथ भादवे यांची उपस्थिती होते.
कारखाना सुस्थितीत असूनही संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे बंद आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांचा ऊस वाळून जात आहे. इतर ठिकाणांवरील ऊसतोड कामगार तोडणीसाठी जास्त रकमेची मागणी करत आहेत. या सर्व प्रकारास कारखाना प्रशासन जबाबदार आहे.
या अकार्यक्षम संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत, कामगारांचे 56 महिन्यांचे वेतन द्यावे, कारखाना सुरू करावा, 1 फेब्रुवारीपर्यंत ही मागणी पूर्ण केली नाही तर संचालकांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू, अशी मागणी या वेळी करण्यात आली.