आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दिवसभर रिमझिम, नोंद फक्त 1.8 मिमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिवसभर आकाशात काळेकुट्ट ढगांची छाया कायम असल्यामुळे सूर्यदर्शनही झालेले नाही. पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. किमान तापमान 22, तर कमाल 25.2 अंशांवर खाली आले आहे. या भिजपावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काही रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी तुंबल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर चिखल झाला असून मध्यवर्ती बस्थानकासमोरील खड्डय़ात तीन दुचाकीस्वार घसरून पडले आहेत.

स्थलनिहाय बदल : शहरातील विविध भागांत पडणार्‍या पावसाचे प्रमाणात स्थलनिहाय बदल आहे. पैठण रोड, छावणी, वाळूज, सातारा परिसरात दमदार पाऊस झाला, तर आकाशवाणी, सिडको, चिकलठाणा भागात कमी प्रमाणात पडला. पडणार्‍या पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, 19 जुलैनंतर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.